इस्लामपूर : केंद्र सरकारने केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे आहेत. जनतेच्या साथीने काँग्रेस पक्ष हे सर्व कायदे हाणून पाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. यापुढील काळात वाळवा तालुक्यातील कार्यकर्त्यांना ताकद दिली जाईल, असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते डॉ. जितेश कदम यांनी केले.
येथील वाळवा तालुका आणि इस्लामपूर शहर काँग्रेसच्यावतीने कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी किसान संमेलन घेण्यात आले. डॉ. कदम यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड. मनीषा रोटे, शहराध्यक्ष राजेंद्र शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पं. स. सदस्य आनंदराव पाटील, हेमंत कुरळे, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप जाधव, राजू वलांडकर, विजय पवार, रंजना माळी, अक्षय फाटक, अर्जुन खरात उपस्थित होते.
फोटो - १००२२०२१-आयएसएलएम- कॉँग्रेस न्यूज
इस्लामपूर येथील काँग्रेसच्या किसान संमेलनात डॉ. जितेश कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अॅड. मनीषा रोटे, बाळासाहेब पाटील, जितेंद्र पाटील, राजेंद्र शिंदे उपस्थित होते.