मलकापूर (जि. कोल्हापूर) : शाहूवाडी-शिराळा तालुक्यातील स'ाद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत अतिक्रमण करून, बेकायदा वास्तव्य करुन पर्यावरणाचा ऱ्हास केल्याबद्दल शाहूवाडी न्यायालयाने नऊ कुटुंबातील ३३ जणांना तीन वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी सुनावली. हा खटला २०१३ पासून सुरु होता.विठ्ठल पाटणे, रामू वकटे, भागोजी झोरे, दगडू बोडके, विठू पाटणे, कोंडिबा बोडके, विठू धोंडिबा पाटणे, शामराव पाटणे, नवलू बोडके, (सर्व रा. भेंडवडे वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी नऊ कुटुंबप्रमुखांची नावे आहेत.स'ाद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येणाºया निवळे, ढाकळे, तनाळी, सोनार्ली, धनगरवाडा, दुर्गेवाडी आदी गावांचे शासनाने १९९८ मध्ये भेंडवडे, वडगाव या ठिकाणी पुनर्वसन केले होते. त्यावेळी या गावातील नागरिकांना जमिनीचा, घरांचा मोबदला देऊन भेंडवडे व वडगाव येथे जमीन उपलब्ध करून दिली होती. २००२ मध्ये यातील नऊ कुटुंबांनी पुन्हा वनविभागाच्या जमिनीत अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या होत्या. या नऊ कुटुंबांची सुमारे ७०० ते ८०० जनावरे जंगलात मोकाट फिरत होती. वनविभागाच्याअधिकाºयांनी वारंवार सूचना देऊन अतिक्रमण हटवा, अशा नोटिसा बजाविल्या होत्या. अखेर वनविभागाच्या अधिकाºयांनी या ३३ जणांविरुद्ध शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.हा खटला शाहूवाडी न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी ए. ए. वाळुंजकर यांच्यासमोर चालला. न्यायालयाने वनविभागाच्या जमिनीत अतिक्रमण करणे, झाडांची तोड करणे, सरकारी जमिनीत गुरे चारणे, पर्यावरणास बाधा पोहोचविणे, आदी मुद्द्यांवर ही शिक्षा ठोठावली.
या निकालाने वनविभागाच्या जमिनीत अतिक्रमण करणाºयांना चांगली चपराक बसली आहे. त्यामुळे वनजमिनीत अतिक्रमण करण्याचे धाडस कोणी करणार नाही किंवा पर्यावरणाचा ºहास करणार नाही.- एस. एल. झुरे, निवृत्त वन अधिकारी.