लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : संपूर्ण कर्जमाफीसाठी जिल्ह्यात सोमवारी अनेक ठिकाणी शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास शेतकºयांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सांगलीत लक्ष्मी फाटा, वसगडे (ता. पलूस), येळावी, मणेराजुरी (ता. तासगाव), कामेरी, येडेनिपाणी (ता. वाळवा), शिरढोण, अलकूड (ता. कवठेमहांकाळ), मालगाव, टाकळी, म्हैसाळ, अंकली (ता. मिरज), कोकरुड (ता. शिराळा) याठिकाणी झालेल्या आंदोलनातील कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. काही वेळानंतर त्यांना सोडून दिले.राज्य शासनाने शेतकºयांना दिलेली कर्जमाफी फसवी आहे. संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी संघटना अजूनही आग्रही आहे. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने राज्यभर ‘चक्का जाम’ आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार सांगली जिल्ह्यात सोमवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.मणेराजुरीत बंदमणेराजुरी : शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सीताराम पवार हे तासगाव येथे उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून सोमवारी मणेराजुरी गाव बंद ठेवून त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. बाळासाहेब पवारांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य सतीश पवार, पं. स. सदस्य संजय जमदाडे, दिलीप जमदाडे, ग्रा.पं.सदस्य सदाशिव कलढोणे, अरुण पवार, दादा पाटील, उपसरपंच नारायण चौगले, संजय पाटील, अविनाश चव्हाण, भाऊसाहेब लांडगे, सचिन जमदाडे, संभाजी पवार, प्रकाश पवार उपस्थित होते.वसगडे येथे ‘चक्का जाम’भिलवडी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने वसगडे (ता. पलूस) येथे सोमवारी ‘चक्का जाम’ आंदोलन करण्यात आले. यावेळी भिलवडी पोलिसांनी स्वाभिमानीचे नेते संदीप राजोबा यांच्यासह सात जणांना प्रतिबंधात्मक कारवाईखाली ताब्यात घेतले. माजी पंचायत समिती सदस्य संदीप राजोबा, धन्यकुमार पाटील, अजित पाटील, महेंद्र राजोबा, सनत पाटील, रोहित पाटील, संदीप पाटील, सचिन पाटील, निशिकांत गावडे, बापू नागवे, रावसाहेब मोळाज आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.इस्लामपूर परिसरात आंदोलन शांततेतइस्लामपूर : सुकाणू समितीने पुकारलेले चक्का जाम आंदोलन वाळवा तालुक्यात शांततेत झाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होते. रेठरेधरण येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रभाकर रामराव पाटील, संभाजी बाळासाहेब पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस उपअधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्यासह आष्टा, कासेगाव पोलिस ठाण्यातील कर्मचाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, कासेगाव येथे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर यांना सकाळी ७ वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईचा निषेध करीत औंधकर यांनी पोलिस ठाण्यातच उपोषण सुरू केले. यावेळी गणेश काळे, आबासाहेब काळे, लक्ष्मण डवरी, संभाजी आडके, स्वरूप पाटील, सागर पाटील, गणेश लोहार उपस्थित होते.शिरढोण, अलकूड (एस) येथे आंदोलनकवठेमहांकाळ : मिरज-पंढरपूर राज्यमार्गावरील शिरढोण व अलकूड (एस) फाटा येथे शेतकरी संघटनेच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी अकरा आंदोलकांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. तालुक्यात सकाळी अकरा वाजता आंदोलनास सुरुवात झाली. शिरढोण तसेच कवठेमहांकाळ-जत रस्त्यावरील अलकूड फाटा या दोन ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिरढोण येथे अशोक माने, नंदकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली, तर अलकूड येथे संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली चक्का जाम करण्यात आला. शिरढोण येथून अशोक माने, दिगंबर कांबळे, नामदेव करगणे, रावसाहेब कुंभार, शिवाजी पाटील, विराट पाटील, सूरज पाटील आदींना पोलिसांनी ताब्यात घेतले. अलकूड (एस) फाटा येथून शंकर भोसले, संदीप पवार, भाऊसाहेब भोसले, विठ्ठल भोसले आदी आंदोलकांना ताब्यात घेतले.
शेतकºयांकडून जिल्ह्यात ‘चक्का जाम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:19 AM