शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

वाळूसाठी नदीकाठाची चाळण

By admin | Published: August 26, 2016 12:21 AM

भिलवडी परिसरातील चित्र : ठेका एका काठावर, उपसा संपूर्ण कृष्णा नदीभर

शरद जाधव -- भिलवडी  --केवळ पैसा मिळविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणारे सैराट बनलेले वाळू तस्कर व जाणीवपूर्वक गांधारीची भूमिका घेणारे सुस्त प्रशासन यामुळे वाळू ठेका एका प्लॉटमध्ये अन् उपसा संपूर्ण कृष्णाकाठावर, असे चित्र आहे. यामुळे पलूस तालुक्यातील भिलवडीसह कृ ष्णा काठाची अक्षरश: चाळण झाली आहे. याप्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.वारंवार व अनधिकृतपणे होणाऱ्या वाळू उपशामुळे नदीकाठची मळी खचण्याबरोबरच जल प्रदूषणाचाही मोठ्याप्रमाणात धोका निर्माण होत आहे. विशेषत: पलूस तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींनी वाळू उपशाला विरोध केला. यामुळे वाळू तस्करांबरोबरच महसूल बुडाल्याने प्रशासनाचा मोठा तोटा झाला असल्याची चर्चा अधिकारी वर्गातून होत आहे. महसूल विभागातील अधिकारी जनतेच्या प्रचंड कळवळ्याने वाळू ठेके चालू करण्यासाठी गावोगाव समक्ष भेटून प्रबोधन करीत होते. गावा-गावात विशेष ग्रामसभाही घेण्यात आल्या. तुम्ही वाळू ठेक्याला का विरोध करता, अशी विचारणा करण्यात आली. खचत असलेला मळीभाग, वाढणारे जलप्रदूषण, तसेच नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने मगरींचे माणसांवर होणारे हल्ले, खराब होणारे रस्ते, जमिनीतील जलवाहिन्यांचे नुकसान आदी कारणांमुळे वाळू ठेक्याला प्रखर विरोध होऊ लागला आहे. प्रथमच प्रशासनाला नागरिकांपुढे हतबल होण्याची वेळ आली. मात्र ठेके वाळवा तालुक्यातील नदीकाठी अन् उपसा पलूस तालुक्यात, हा नवा फॉर्म्युला ठेकेदार अन् प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे. मर्दवाडीतील ठेके दार पाण्यातील बोटी अन् पाईप वाढवून भिलवडी हद्दीतील वाळू उपसा करू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून या गोष्टीची चौकशी करण्यासाठी गेलेले भिलवडीचे सरपंच सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना धमकी ठेकेदार देतात. पलूसचे प्रशासन केवळ चौकशीचा फार्स करून पडदा टाकते, ही शोकांतिका आहे. तुमचा वाळू ठेका जर अधिकृत असेल, तर निर्धारित केलेल्या क्षेत्रात व मुदतीतच वाळू उपसा करावा, अशी मागणी भिलवडी ग्रामपंचायतीची आहे. ‘लोकमत’च्या दणक्याने उपसा अंतर घटलेसरपंच सुरेंद्र वाळवेकर यांनी तालुका प्रशासनाने तक्रार करूनही दखल न घेतल्याने भिलवडी पोलिसांत तक्रार केली आहे. या घटनेचे वृत्त सडेतोडपणे प्रसिध्द झाल्यानंतर प्रशासनाने भेट देऊन पाहणी केली, मात्र भिलवडीच्या काठावर उपसा करणाऱ्या बोटी वाळवा हद्दीत पूर्ववत नेल्याचे आढळून आले. चौकशी सुरू झाली की, नियमात उपसा व वातावरण थंड झाले की मोठ्या मशिनरीने उपसा केला जातो.