सांगली : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासाठी ३१ सदस्यसंख्या आवश्यक आहे. सध्या भाजपकडे २५ जागा असल्या तरीही, त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी सहा जागांची जुळवाजुळव करताना अडचणी येणार आहेत. वाळवा तालुक्यातील रयत विकास आघाडीच्या चार जागांसह २९ जागांवर भाजपने दावा केला आहे. मात्र, आघाडीतील तीन सदस्य भाजपला पाठिंबा देण्यास बांधील नसल्याचे सांगून राहुल महाडिक यांनी सायंकाळी खळबळ उडवून दिली, तर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी पाठिंब्याच्या बदल्यात उपाध्यक्षपद मागितले आहे.जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले असल्यामुळे इच्छुकांची संख्या जास्त आहे. नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांना अध्यक्षपदाच्या लाल दिव्याच्या गाडीची स्वप्ने पडू लागली आहेत. जिल्हा परिषदेतील ६० जागांपैकी सर्वाधिक २५ जागा भाजपला मिळाल्यामुळे त्यांनी सत्ता स्थापण्याचा दावा केला आहे. अन्य कोणतेही पक्ष, आघाड्यांना बरोबर घेऊन सत्ता मिळविण्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी यांनी भाजप, काँग्रेस, क्रांती आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना एकत्रित करून रयत विकास आघाडी केली होती. या आघाडीला चार जागा मिळाल्याने भाजपला सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी या संख्याबळाची गरज लागणार आहे.भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी निकालानंतर लगेचच सांगलीत पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या २५ आणि रयत विकास आघाडीच्या चार, अशा २९ जागा आपल्याकडे असल्याचा दावा केला. मात्र रयत विकास आघाडीत नानासाहेब महाडिक यांचे तीन आणि वैभव नायकवडी गटाचे एक सदस्य आहेत. नानासाहेब महाडिक यांचे पुत्र राहुल महाडिक यांनी सायंकाळी पत्रकारांना सांगितले की, आमचे तीन सदस्य भाजपला पाठिंबा देण्यास बांधील नाहीत. जो पक्ष सन्मानाची वागणूक देईल, त्यांना पाठिंबा देणार आहोत. भाजपसाठी हा मोठा धक्का असून सत्तेसाठी लागणारे ३१ सदस्यांचे गणित मांडताना त्यांना (पान कक वर)अध्यक्षपदाचे प्रमुख दावेदारभाजपचे डी. के. पाटील (चिंचणी, ता. तासगाव), शिवाजी डोंगरे (कवलापूर, ता. मिरज), संग्रामसिंह देशमुख (कडेपूर, ता. कडेगाव), सुरेंद्र वाळवेकर (भिलवडी, ता. पलूस), ब्रह्मदेव पडळकर (खरसुंडी, ता. आटपाडी).
झेडपीत सत्ता स्थापण्याचे भाजपपुढे आव्हान
By admin | Published: February 23, 2017 11:43 PM