शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
4
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
5
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
7
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
8
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
9
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
10
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
11
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
12
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
13
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
14
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
15
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
16
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
17
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
19
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
20
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 

मानसिंगराव गटाच्या सत्तेला आमदारांचे आव्हान

By admin | Published: July 05, 2016 11:46 PM

शिराळा नगरपंचायतिचे संभाव्य चित्र

विकास शहा-- शिराळा शिराळा ग्रामपंचायतीची स्थापना १२ डिसेंबर १९४० रोजी झाली. ग्रामपंचायत अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना १६ मार्च २०१६ रोजी ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपंचायतीची स्थापना करण्यात आली. स्थापनेपासूनच शिराळा ग्रामपंचायतीवर नाईक गटाची सर्वात जास्त सत्ता होती, ती अगदी शेवटपर्यंत टिकली. ग्रामपंचायत बरखास्त होताना माजी आमदार नाईक-देशमुख यांची निर्विवाद सत्ता होती. ग्रामपंचायतीत १७ पैकी राष्ट्रवादीचे ११, काँग्रेसचे ५, तर आमदार शिवाजीराव नाईक गटाचा एकच सदस्य होता.आमदार शिवाजीराव नाईक यांनी १९९५ पासून लोकप्रतिनिधी असताना, शिराळा बायपास, पोलिस ठाणे इमारत, न्यायालय इमारत, तहसील कार्यालय सभागृहाची उभारणी केली, तर माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी आमदारकीच्या काळात शिराळा शहराचा ब वर्ग पर्यटन क्षेत्रात समावेश करण्यात यश मिळविले. यामुळे मोठा निधी या शहरात आला. यातून शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण, गटारी अशी जवळपास २.२५ कोटीची कामे झाली. तसेच ७.५० कोटींची शिराळा पाणीपुरवठा योजना मार्गी लागली. एसटी बसस्थानक, प्रशासकीय इमारत, पंचायत समिती इमारत, एसटी बसस्थानक ते पंचायत समिती फूटपाथ, अंबामाता मंदिराचा संपूर्ण कायापालट केला. या चार-पाच वर्षांत शिराळा शहरात मोठा विकास झाला. त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड आहे. काँग्रेसचे सत्यजित यांची साथ राष्ट्रवादीला असल्याने या ठिकाणी नाईक-देशमुख गटाची ताकद मोठी आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीत या आघाडीस शह देण्यासाठी आमदार नाईक गट (भाजप), शिवसेना, जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक गट हे गट एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विश्वास साखर कारखान्याचे संचालक रणजितसिंह नाईक गटाची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे.निधीच्या कमतरतेमुळे शिराळासारख्या मोठ्या शहरात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कारभार करताना मर्यादा येत होत्या. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट, स्वच्छता अशी कामे करताना प्रशासनाची तारांबळ उडत होती. तरीही योग्य नियोजन करुन सोमवारचा बाजार झाला की, त्याचदिवशी रात्री १ ते २ वाजेपर्यंत संपूर्ण परिसराची स्वच्छता, त्या कचऱ्याची विल्हेवाट, शिराळा शहराला वेळेत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न बहुतांशी यशस्वी झाला. शिराळा नगरपंचायतीसाठी ही पहिलीच निवडणूक होत असल्याने पहिले नगरसेवक कोण, पहिला नगराध्यक्ष कोण, यासाठी मोठी चर्चा सुरू आहे. मानसिंगराव नाईक गट, देशमुख गटाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी चढाओढ आहे. इच्छुकांकडून सुरक्षित प्रभागाचा शोधआरक्षणामुळे काही उमेदवारांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे हे नेते आरक्षणाला सुरक्षित तसेच शेजारच्या प्रभागात उमेदवारी मिळते का? यासाठी प्रयत्नशील आहेत. आतापासूनच त्यासाठी नेतेमंडळींकडे पाठपुरावा करताना दिसत आहेत. पहिल्या नगरपंचायतीत आपण ‘नगरसेवक’ व्हायचेच, यासाठी अनेकांची धडपड चालू आहे.