शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

सत्तांतरासाठी अनिलभाऊंसमोर खडतर आव्हान...-

By admin | Published: June 28, 2016 11:12 PM

विटा नगरपालिका संभाव्य चित्र

दिलीप मोहिते -- विटा नगरपरिषदेत सध्या कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आ. सदाशिवराव पाटील गटाची एकहाती सत्ता आहे. त्यांच्या माध्यमातून लोकनेते हणमंतराव पाटील यांची तिसरी पिढी आज सत्तेत आहे. मागील निवडणुकीत माजी आ. पाटील यांचे विरोधक विकास आघाडीचे नेते अशोकराव गायकवाड यांनी कॉँग्रेसशी युती केली. तर शिवसेनेचे आ. अनिल बाबर यांनी गायकवाड यांचे दुखावलेल्या कार्यकर्त्यांची एकत्रित मोळी बांधून सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. त्यामुळे नगरपरिषदेत सध्या माजी आ. पाटील यांच्या कॉँग्रेसचे १५, गायकवाड समर्थकांचे ५, तर आ. बाबर समर्थक ३ असे एकूण २३ नगरसेवक कार्यरत आहेत. मात्र, पालिकेतील स्वाभिमानी विकास आघाडीतून विजयी झालेल्या तीन विरोधी नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांविरूध्द सभागृहात रान उठविल्याचे दिसून आले नाही. उलट सत्ताधारी सदाभाऊ व अशोकभाऊ यांच्या युतीतील अशोकराव गायकवाड यांच्या नगरसेवकांनीच बऱ्यापैकी काही ठरावांना विरोध करून सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र गेल्या पाच वर्षात पाहावयास मिळाले. दरम्यान, सुवर्णनगरी म्हणून परिचित असलेल्या विटा नगरपरिषदेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचा निर्णय अद्याप गुलदस्त्यात असला तरी कॉँग्रेस व शिवसेना यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. शिवसेनेचे आ. बाबर यांनी गेल्या अनेक वर्षाच्या सदाभाऊंच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी आ. अनिलभाऊंनी धनुष्यबाणाचा दोर ताणला आहे. तर तीन पिढ्याची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी सदाभाऊंनी आपले मावळे सज्ज ठेवले आहेत. या निवडणुकीसाठी दोन्ही गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विटा नगरपरिषदेने घरपट्टी व पाणीपट्टीसह विविध कर मालमत्ताधारकांकडून वसूल करण्यासाठी आॅनलाईन कर वसुली पध्दत सुरू केली आहे. घरबसल्या मालमत्ताधारकाला आपला कर आॅनलाईनवरून नगरपरिषदेच्या बॅँक खात्यावर वर्ग करण्यात येत आहे. तसेच नाहरकत दाखल्यांसह विविध दाखले, मालमत्ता उतारे आदी संगणकीकृत करण्यात आले असून, एका खिडकीत ही सर्व कागदपत्रे तात्काळ उपलब्ध होत असल्याचे नागरिकांची सोय झाली आहे. तसेच इंदिरा आवास घरकुलच्या माध्यमातून नाममात्र किंमतीत पालिका प्रशासनाने दारिद्र्य रेषेखालील लोकांना घरे बांधून दिली आहेत.यावेळी नगराध्यक्ष निवड थेट जनतेतूनच होणार असल्याने एका मतदाराला तीन मतदान करण्याचा अधिकार राहणार आहे. नगराध्यक्ष निवड जनतेतून होणार असल्याने आता या पदाला स्थैर्य आणि नगराध्यक्षाला काम करण्यास चांगली संधी मिळणार आहे. परिणामी शहराचा विकासही वेगाने होण्यास मदत होणार आहे. नगराध्यक्ष निवडीबाबत ‘तोंडावर बोट..’नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठीचे इच्छुक अद्याप ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ ठेवून बसले आहेत. परिणामी, यावर्षीची विटा नगरपरिषदेची निवडणूक कॉँग्रेसच्या सत्ताधारी गटासह विरोधी शिवसेना पक्षालाही प्रतिष्ठेची व अस्मितेची ठरणार आहे.कॉँग्रेसची एकहाती सत्ताविटा नगरपरिषदेच्या राजकारणात माजी आ. सदाशिवराव पाटील व विकास आघाडीचे नेते अशोकराव गायकवाड हे प्रमुख राजकीय विरोधी गट यापूर्वी सक्रिय होते. परंतु, गत निवडणुकीत सदाभाऊ व अशोकभाऊ यांच्यात युती झाल्याने आ. अनिलभाऊ बाबर यांनी स्वतंत्र स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना आव्हान देऊन तीन नगरसेवक विजयी केले. आता कॉँग्रेसचे माजी आ. सदाभाऊ, अशोकभाऊ, विरोधी शिवसेनेचे आ. अनिलभाऊ बाबर यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे. नगराध्यक्ष वैभव पाटील, अ‍ॅड. अजित व सुमित गायकवाड या सदाभाऊ आणि अशोकभाऊंच्या शिलेदारांविरूध्द विरोधी शिवसेनेचे सुहास बाबर, अमोल बाबर या युवा नेत्यांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विटा शहराच्या राजकीय पटलावर नगरपरिषदेची निवडणूक ही जिल्ह्यात लक्षवेधी ठरत असते. या निवडणुकीसाठी सत्ताधारी कॉँग्रेस व विरोधी शिवसेना पक्षाने राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापू लागले असून, सत्ताधारी गटाचे कार्यकर्ते व विरोधी गटाचे शिवसैनिक यांच्यात सोशल मीडियावर ‘निवडणूक वॉर’ सुरू झाले आहे. मात्र माजी आ. सदाशिवराव पाटील यांची गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षांची सत्ता उलथवून टाकून सत्तांतर घडविण्यासाठी शिवसेनेचे आ. अनिलभाऊ बाबर यांची कसोटी लागणार आहे.