शीतल पाटील - सांगली- मागील विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे यांचा अर्ज कायम राहिल्याने काँग्रेसला मतविभागणीची धास्ती लागली आहे. त्यात भाजपने मात्र मतांची विभागणी टाळण्यासाठी अनेक अपक्षांना माघारीची गळ घालत गळाला लावले. राष्ट्रवादीने सांगली मतदारसंघात उमेदवार दिला असला, तरी अद्याप या पक्षाचे अनेक कार्यकर्ते प्रचार यंत्रणेपासून दूरच आहेत. ‘साहेब सांगतील तसे’, असे म्हणत राष्ट्रवादीचे नगरसेवक माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. सांगली विधानसभा मतदारसंघात यंदा बहुरंगी लढत होत आहे. युती आणि आघाडी तुटल्यानंतर सर्वच प्रमुख पक्ष पंधरा वर्षांनंतर आपापली ताकद आजमावत आहेत. काँग्रेसचे उमेदवार, माजी मंत्री मदन पाटील यांनी सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीला टार्गेट करीत मैदानात येण्याचे आव्हान दिले. त्यात त्यांच्या निशाण्यावर राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष दिनकर पाटील होते. आघाडी व युती तुटल्यानंतर पाचही प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंंगणात उतरले आहेत. आता त्यात काँग्रेसचे बंडखोर मुन्ना कुरणे व दिगंबर जाधव यांची भर पडली आहे. या दोघांनीही मदन पाटील यांच्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून आघाडी उघडली होती. त्यांचे बंड शमविण्याचा प्रयत्नही झाला; पण आज अर्ज माघारीनंतर हा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. सांगलीत मुस्लिम मतदारांची मोठी व्होट बँक आहे. आतापर्यंत तरी या मतदारांनी काँग्रेसला साथ दिली होती; पण आता समाजाचा उमेदवार रिंगणात आल्याने मुस्लिम मतदार कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. काँग्रेसलाही या मतविभागणीची धास्ती लागली आहे. भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी पक्षातील बंडोबांना थंडोबा केले. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे, शिवप्रतिष्ठानचे हणमंत पवार यांना अर्ज मागे घ्यायला लावून त्यांनी पहिल्या टप्प्यात बाजी मारली. राष्ट्रवादीचे दिनकर पाटील यांनी अर्ज मागे घेतला असला, तरी त्यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. दिनकर पाटील यांच्यासह काही नगरसेवकही अद्याप जयंत पाटील यांच्या आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात राष्ट्रवादीतील काही मंडळी भाजपच्या पाठीशी राहिली तर आश्चर्य वाटू नये. भाजपमधून बाहेर पडून शिवबंधन बांधणारे पृथ्वीराज पवार, जनसुराज्य शक्ती पक्षाच्या डॉ. जयश्री पाटील, मनसेच्या स्वाती शिंदे यांच्या उमेदवारीमुळे यंदाची निवडणूक बहुरंगी होत आहे. अशोक वारे, आकाराम पाटील, उत्तम मोहिते, प्रा. अंकुश घुले, अझरुद्दीन पटेल, प्रमोद देवकते, विनायक होवाळे यांच्यासह १७ अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यंदा सर्वाधिक अपक्ष उमेदवार असल्याने त्यांचा फटका कोणत्या पक्षाला बसणार, याची गणिते मांडली जाऊ लागली आहेत. तरीही प्रमुख पाच पक्षात रंगतदार लढत अपेक्षित आहे. नसांगली एकूण मतदार ३,२५,००५ावपक्षमदन पाटीलकाँग्रेससुरेश पाटीलराष्ट्रवादीसुधीर गाडगीळभाजपपृथ्वीराज पवारशिवसेनास्वाती शिंदेमनसेडॉ. जयश्री पाटील जनसुराज्यमुन्ना कुरणेअपक्षदस्तगीर मलीदवालेबमुपासचिन पवारबसपादिगंबर जाधवअपक्षसुरेश टेंगलेअपक्षनसीम महातअपक्ष
सांगली काँग्रेसपुढे बंडखोरीमुळे आव्हान
By admin | Published: October 01, 2014 11:20 PM