शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खानापुरात चुरशीचा चौरंगी सामना

By admin | Published: October 01, 2014 11:24 PM

राष्ट्रवादीच्या सुभाषआप्पांची बंडखोरी : मनसेही नशीब अजमावणार

दिलीप मोहिते -- विटा--आघाडी व महायुती तुटल्याने यावेळी खानापूर विधानसभा मतदारसंघात रंगतदार लढत होत असून, कॉँग्रेसचे विद्यमान आमदार सदाशिवराव पाटील यांच्यासह माजी आमदार अनिल बाबर (शिवसेना), आटपाडीचे अमरसिंह देशमुख (राष्ट्रवादी) आणि गोपीचंद पडळकर (भाजप) या प्रमुख चार उमेदवारांत चुरशीची लढत अपेक्षित आहे. यावेळी हातनूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे समर्थक सुभाषआप्पा पाटील यांनी बंडखोरी केली असल्याने, राष्ट्रवादीला विसापूर मंडलमध्ये फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने भक्तराज ठिगळे हेसुध्दा मैदानात उतरले आहेत. यावेळी खानापूर तालुक्यातील दोन, आटपाडी तालुक्यातील दोन असे चार तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने चुरस वाढली आहे.खानापूर मतदारसंघात कॉँग्रेसचे सदाशिवराव पाटील गेल्या दहा वर्षांपासून प्रतिनिधीत्व करीत आहेत. २००९ च्या निवडणुकीत पाटील यांच्याविरूध्द राष्ट्रवादीच्या पाठबळावर अनिल बाबर यांनी अपक्ष म्हणून शड्डू ठोकला होता. त्यावेळी आटपाडीचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा पाठिंबा असूनही पाटील यांनी बाबर यांचा पराभव केला होता. आता बाबर यांनी राष्ट्रवादीला ‘जय महाराष्ट्र’ करून शिवसेनेतून उमेदवारी घेतली आहे. त्यामुळे अपवादात्मक जुने शिवसैनिक वगळता बाबर यांच्यासोबत राष्ट्रवादीत असलेले कार्यकर्ते शिवसैनिक झाले आहेत. पर्यायाने यावेळी राष्ट्रवादीच्या मतांचेच विभाजन झाल्याचे दिसून येते.अमरसिंह देशमुख यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आटपाडीला पहिल्यांदाच पक्षाच्या तिकिटावर संधी मिळाली आहे. विट्याचे अशोकराव गायकवाड यांनी माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या साक्षीने अमरसिंह देशमुख यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशमुख यांची विट्यातील शक्ती वाढणार आहे. रासपचे गोपीचंद पडळकर यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचे खा. संजय पाटील यांचे स्टार प्रचारक झाल्याचा फायदा पडळकरांना मिळाला. त्यांना भाजपने उमेदवारी दिल्याने लोकसभेला रूजलेले ‘कमळ’ चिन्ह पडळकरांच्या पदरात पडले. मोदी लाटेचा त्यांना कितपत फायदा मिळणार, याकडे नजरा लागल्या आहेत.मतदारसंघात समाविष्ट असलेल्या विसापूर मंडलमधील हातनूरचे माजी जि. प. सदस्य सुभाषआप्पा पाटील हे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे पूर्वाश्रमीचे समर्थक आहेत. त्यांनीही रिंगणात उतरून बंडाचा झेंडा रोवला आहे. पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी प्रयत्न झाले. परंतु, ते निवडणूक लढविण्याच्या विचारापासून बाजूला झाले नाहीत. त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीमध्येच बंडखोरी झाली आहे. त्याचा फटका विसापूर मंडलमध्ये राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. संपत खाडे, राजेंद्र निकम हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. दिघंचीतील राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख व रावसाहेब पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे.खानापूर-आटपाडीएकूण मतदार २,९६,०३३ नावपक्षसदाशिवराव पाटीलकाँग्रेसअमरसिंह देशमुख राष्ट्रवादीअनिल बाबर शिवसेनागोपीचंद पडळकरभाजपसुभाष पाटीलअपक्षभक्तराज ठिगळेमनसेअ‍ॅड्. सतीश लोखंडेभाकपसंजय पुकळेबसपाबाळू देठे बहुजन मुक्ती पार्टीरवींद्र जाधव भा.नौ.से.प.बाबासाहेब कदमअपक्षरविराज पवारअपक्ष