दुधगांव : मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांच्या प्रयत्नातून कोरोना सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरला चेंबर ऑफ कॉमर्सकडून पाच ऑक्सिजन सिलिंडर, एन ९५ मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट, हॅन्डग्लोज, औषधे असे विविध वैद्यकीय साहित्य देण्यात आले.
चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शरद शहा म्हणाले, कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी कवठेपिरानमध्ये उल्लेखनीय कार्य सुरू आहे. या समाजोपयोगी कार्यात आमच्या संस्थेकडून थोडी मदत म्हणून वैद्यकीय साहित्य दिले आहे. भविष्यात सेंटरला आणखी काही मदत लागल्यास देण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
वैद्यकीय साहित्य दिल्याबद्दल भीमराव माने यांनी चेंबरचे आभार मानले.
यावेळी मानद सचिव प्रशांत पाटील, माजी उपसरपंच सागर पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज मगदूम, डॉ. रमेश पाटील, डॉ. महेश साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य विनोद देसाई, सुशांत देसाई, शेतकरी संघटनेचे प्रदीप कार्वेकर उपस्थित होते.