शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सांगलीतील चांदोली धरण चार महिन्यांपासून अंधारात, वीजवाहिनी बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:31 PM

ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्याने पथदिवे बंदच

आनंदा सुतारवारणावती : शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाचे बांधकाम पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी पूर्ण झाले आहे. मात्र, आजपर्यंत एकदाही धरणावरील रस्त्यांची डागडुजी केलेली नाही. धरणावरील यंत्रसामग्रीही जुनाट झाली आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचे रस्ते आहेत. त्यांची आता दुरवस्था झाली आहे.धरणाला चार वक्राकार दरवाजे आहेत. प्रत्येक पावसाळ्यात पाणीपातळी वाढली की या दरवाजांतून पाणी सोडले जाते. हे दरवाजे उचलण्यासाठी उच्च विद्युत दाबाची आवश्यकता असते. मात्र, त्यासाठीचा ट्रान्सफॉर्मर सांडव्यापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. या अंतरामुळे विद्युतदाब कमी प्रमाणात उपलब्ध होतो. परिणामी, दरवाजे मध्येच बंद पडतात. सध्या प्रशासनाने येथे जनरेटरची व्यवस्था केली आहे. मात्र, ती व्यवस्था कायमस्वरूपी पर्याय नाही. त्यासाठी हा ट्रान्सफॉर्मर जवळच बसविणे गरजेचे आहे. ऐनवेळेला जनरेटर बंद पडला तर वक्राकार दरवाजे चालू अथवा बंद करताना व्यत्यय निर्माण होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरणावरील पथदिवे पूर्णत: बंद आहेत.महावितरणकडून उच्च दाब (३३ केव्ही)लाइन स्वतंत्र दिली असून, मागील कित्येक महिन्यांपासून ३३ केव्ही ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने धरणावर अंधाराचे साम्राज्य असते. सुरक्षेच्या दृष्टीने धरणावर बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंदच आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या सीमेवर सुरक्षेसाठी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कसलीही व्यवस्था धरण प्रशासनाने पुरविली नसल्याने मोठा धोका आहे. महती कंपनीच्या विद्युत केंद्रातून तात्पुरत्या स्वरूपात वीज घेऊन सांगली जिल्ह्यातील सुरक्षा चौकीला रात्रीच्या वेळी अंधारातून उजेडात आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

महावितरणकडून ३३ केव्ही स्वतंत्र वीजपुरवठा केला आहे. ही लाइन धरणाच्या बांधकामावेळी टाकलेली असून, त्याच्या दुरुस्तीसाठी सध्या वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविला आहे. धरणावर स्वतंत्र जनरेटरची व्यवस्था केली असून, सध्या तो कार्यरत आहे. - गोरख पाटील, शाखा अधिकारी, वारणावतीचांदोली धरण बांधकामावेळी हजारो कामगार उपलब्ध होते. परंतु, अलीकडच्या २० ते २५ वर्षांत धरण प्रशासनाचे अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी वास्तव्यास नाहीत. त्यामुळे अंधाराबरोबरच धरणाची सुरक्षा आणि देखभाल रामभरोसेच आहे. - सावळाराम पाटील, मणदुर, ग्रामस्थ

टॅग्स :SangliसांगलीDamधरणelectricityवीज