शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
4
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
5
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
6
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
7
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
8
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
9
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
11
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
12
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
13
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
14
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
15
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
16
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
17
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
18
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
19
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
20
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

Sangli: रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची पाण्याची मागणी, चांदोली धरणातून पहिल्या आवर्तनास सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 17:41 IST

वीजनिर्मिती केंद्रातून ८३३ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग 

विकास शहाशिराळा : चांदोली धरणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन सुरू करण्यात आले आहे. वीजनिर्मिती केंद्रातून ८३३ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यातील ५८३ क्यूसेकने नदी पात्रात व २५० क्यूसेकने डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. तालुक्यातील ४७ पाझर तलावात दोन टक्क्यांनी तर मध्यम प्रकल्पातील १० टक्क्यांनी पाणीसाठा कमी झाला आहे.चांदोली धरण २८ सप्टेंबरला पूर्ण क्षमतेने भरले होते. सध्या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली आहे. या मागणीनुसार अगोदर १५० क्यूसेक व नंतर २५० क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याचबरोबर मोरणा धरणातूनही विसर्ग सुरू आहे.

लघु पाटबंधारे उपविभागांतर्गत तालुक्यात एकूण ४९ पाझर तलाव आहेत. या तलावातील पाणी साठवण क्षमता २३६.४१ दशलक्ष घन फूट इतकी आहेत, तर ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले होते. त्यामधील पाणीसाठ्यात दोन टक्क्यांनी घट होऊन सध्या २२५.९१ दशलक्ष घन फूट इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.सर्व तलावाची सिंचन क्षेत्र क्षमता १६५९ हेक्टर इतकी आहे. ११ सिमेंट नाला बंधारेही पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. यामध्ये ४.५२ दश लक्ष घन फूट पाणीसाठा उपलब्ध झाला असून यांची सिंचन क्षेत्र क्षमता ४८.९७ हेक्टर इतकी आहे. करमाळे नंबर १ व पाचुंब्री पाझर तलावाचे साठवण तलावामध्ये रूपांतर करण्याचे दुरुस्तीचे काम मृद व जलसंधारण विभागामार्फत सुरू आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत सदर तलावात मृतसाठा शिल्लक आहे.

चांदोली धरण - पाणीसाठा ३४.१२ टीएमसी (९३.३८%)उपयुक्त पाणीसाठा - २५.२४ टीएमसी (९१.७३%)

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडलेला एकूण पाऊस मिमीमध्ये

  • पाथरपुंज येथे - ८१८६
  • निवळे - ६५५०
  • धनगरवाडा - ४०३२
  • चांदोली धरण - ३९९१

मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा टक्क्यांमध्ये

  • मोरणा - ९०
  • करमजाई - ८१
  • अंत्री बुद्रूक - ९३
  • गिरजवडे - ९३
  • शिवनी - ९२
  • टाकवे - ९६
  • रेठरे धरण- ९०
  • कार्वे - ८५.

पाझर तलावातून थेट पंप टाकून किंवा सायफन पद्धतीने पाणी उपसा करू नये अन्यथा संबंधितावर योग्य ती कारवाई केली जाईल तरी सर्व शेतकरी बांधव, तसेच नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. त्याचप्रमाणे तालुक्यातील ११ सिमेंट बंधाऱ्यांचे दरवाजे त्वरित बसविण्याबाबत संबंधित ग्रामपंचायत व पाणी वापर संस्था यांना कळविण्यात आले आहे. - प्रवीण तेली, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, शिराळा

टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणीFarmerशेतकरी