शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

चांदोली अभयारण्य शिकार : तिघांना अटक

By admin | Published: June 21, 2016 11:23 PM

कॅमेऱ्यात कैद : ‘लोकमत’च्या वृत्ताने जाग

वारणावती : चांदोली अभयारण्यातील चोरट्या शिकारीवर प्रकाशझोत टाकणारी बातमी ‘लोकमत’मधून प्रसिध्द होताच अभयारण्यात प्रशासन खडबडून जागे झाले आणि अभयारण्यातील कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये पाहणी केल्यावर चोरटे कॅमेऱ्यात टिपले गेल्याचे लक्षात आल्यावर अभारण्याशेजारील कुंडी (ता. संगमेश्वर) गावात शोध घेण्यात आला व अंकुश राजाराम जांगळे (४५), सचिन पांडुरंग कोलम (२८), दीपक नरहरी मृदगे (१९) यांना अटक करण्यात यश मिळाले. सांगली येथे बिबट्याची कातडी तस्करांकडून जप्त केल्यानंतर त्यांनी चांदोली अभयारण्यात बिबट्याची शिकार केल्याची कबुली दिली. त्यानंतर अभयारण्यात चोरट्या शिकारी होत असल्याची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच अभयारण्य प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी अभयारण्यात बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांची पाहणी केली असता, चांदोली (ता. शाहूवाडी) हद्दीतील कॅमेऱ्यामध्ये बॅटरीच्या प्रकाशात बंदूक घेऊन आलेले पाच-चहा शिकारी कैद झालेले आढळले. त्यांचा शोध घेण्यासाठी विभागीय वन अधिकारी एस. एल. झुरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार पाटील, वनक्षेत्रापाल प्रज्योत पालवे, अरविंद मांडवकर, विठ्ठल खराडे, ज्ञानदेव परीट, आर. के. पवार, सुनील भिसे, देवकी तासीलदार यांच्या पथकाने कुंडी गावात शोधमोहीम राबवली. त्यामध्ये अंकुश जांगळे, सचिन कोलम, दीपक नरहरी मृदगे त्यांना अटक केली. या तिघांना शाहूवाडी येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांनाही सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)