शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

चांदोलीचा पर्यटन विकास आराखडा रखडला

By admin | Published: June 04, 2017 11:02 PM

चांदोलीचा पर्यटन विकास आराखडा रखडला

विकास शहा । लोकमत न्यूज नेटवर्कशिराळा : चांदोलीचा पर्यटन विकास होणार...पर्यटन विकास होणार असे १९८५ पासून सांगण्यात येते; मात्र जो पर्यटन विकास व्हायला पाहिजे, तो अद्याप झालेला नाही. त्यामुळे निसर्गाचा अनमोल ठेवा असणारे चांदोली अद्यापही पाहायला पर्यटकांना अडचणीचे होत आहे.चांदोली अभयारण्यातील हिरवीगार वनराई, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, वसंतसागर जलाशय, विविध औषधी वनस्पतींचे माहेरघर, वन्यप्राणी असे येथील निसर्गसौंदर्य. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने १९८५ मध्ये हा परिसर चांदोली अभयारण्य म्हणून घोषित केला; मात्र तब्बल ३२ वर्षे झाली तरीही ज्या पध्दतीने या परिसराचा पर्यटन क्षेत्र विकास व्हायला पाहिजे होता तसा झालेला नाही. दळणवळणासाठी मुख्य रस्त्याची गरज, मात्र अपुरे रस्ते, वाहनांचा तुटवडा, मनुष्यबळाची कमतरता, रखडलेले पुनर्वसन अशा विविध समस्या आजही जाणवत आहेत.जुलै २०१२ मध्ये ‘युनेस्को’ने या परिसराचा जागतिक वारसा यादीत समावेश केला. त्यामुळे हे उद्यान जगाच्या नकाशात झळकू लागले आहे. जैवविविधतेने नटलेल्या या उद्यानात पक्ष्यांच्या विविध प्रजाती, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, फुलपाखरे, प्राण्यांच्या विविध प्रजाती आढळतात. औषधी वनस्पतींचे माहेरघर म्हणून या उद्यानाची ओळख आहे.सोमवारी येथे पर्यटनाचा सुटीचा दिवस असतो. मंगळवार ते रविवार या सहा दिवसांत पर्यटकांना उद्यानात सोडले जाते. माणसी ३० रुपये, चारचाकी वाहनांचे १५० रुपये व गाईडचे ३०० रुपये पर्यटकांना मोजावे लागतात. बिबटे, गवे, अस्वल, रानडुक्कर, सांबर, भेकर, गेंडा, साळींदर, वानर, माकड, उदमांजर, शेकरू, ससा, खवले मांजर, मुंगूस तसेच वाघाचेही येथे अस्तित्व आहे. या प्राण्यांचे दर्शन व्हावे म्हणून पर्यटक येतात; मात्र पर्यटकांना दर्शन होत नाही. याचे कारण अभयारण्याचे मोठ्या प्रमाणात असणारे विस्तारित क्षेत्र, फार कमी वेळ उद्यानात थांबण्याचा वनविभागाने दिलेला परवाना, याचबरोबर वन्यप्राणी सायंकाळी बाहेर पडतात, त्याचवेळी पर्यटकांनाही अभयारण्याबाहेर जावे लागते. वन्य विभागाकडून कोणत्याही वाहनाची सोय होत नाही. त्याचबरोबर दुचाकी वाहनांना उद्यानात प्रवेश नसल्याने पर्यटकांना अभयारण्य न पाहताच परतावे लागते.तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी चांदोली धरणाच्या जलाशयता नौकाविहार, वनक्षेत्रात वन सफारीची योजना राबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार विजया यादव यांची यासाठी नेमणूकही केली होती. मात्र कुशवाह यांची बदली झाली आणि हे काम थांबले. सध्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड हे सकारात्मक आहेत. चांदोली विश्रामगृहावर सर्व खात्यांची बैठक घेऊन नौकाविहाराची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यापुढे काही नाही घडले. पर्यटन विकास महामंडळाची फार मोठी जबाबदारी येथे गरजेची आहे. पर्यटकांना राहणे, भोजन, संरक्षण व्यवस्था याबाबत सोयी होणे गरजेचे आहे.विद्यमान आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, विधानपरिषद माजी सभापती आमदार शिवाजीराव देशमुख यांनी वारंवार पाठपुरावा करून, अभयारण्याभोवती संरक्षक भिंत उभी करावी, ताडोबाच्या धर्तीवर जीप सफारी व्यवस्था व्हावी, नौकाविहार चालू करावा, चांदोली धरणाच्या पुढील मोकळ्या भागात पैठणच्या धर्तीवर उद्यान व्हावे, गुढे-पाचगणी पठार विकास, पर्यटन विकास व तात्पुरते रोजगार विकास यासाठी ते आग्रही राहिले आहेत. मात्र शासनाकडून वेगाने याबाबत हालचाली होताना दिसत नाहीत.धनधांडग्यांनी जमिनी घेतल्यायाठिकाणी पर्यटनस्थळ होईल, यामुळे धनधांडग्यांनी अल्प दरात जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत. याठिकाणी तातडीने पर्यटनस्थळ शासनाने विकसित करावे, त्यासाठी निधी, तसेच येथील नागरिकांसाठी विकासाचे दालन उघडावे, अशी मागणी होत आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी जलाशयात नौकाविहार, वन सफारीची योजना राबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार विजया यादव यांची यासाठी नेमणूकही केली होती. मात्र कुशवाह यांची बदली झाली आणि हे काम थांबले.