शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

By अविनाश कोळी | Published: May 16, 2024 10:18 PM

Vishal Patil : विशाल पाटील म्हणाले, आमदार विश्वजीत कदम यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी काम केले.

सांगली : चंद्रहार पाटील यांचा या निवडणुकीत बळी गेला, याचे दु:ख मलाही आहे. पण, खासदारांच्या दिलदार शत्रूनेच त्यांचा घात केला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, भाजपाचे खासदार संजय पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत अनेक षडयंत्रे आखली. ती फसल्याने ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, अशी भावना खासदार व्यक्त करीत असले तरी याच दिलदार शत्रूशी संगनमत करुन त्यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले नाही.

लोकसभा निवडणुकीत षड्यंत्र रचले गेल्यानंतर खासदारांचा आत्मविश्वास वाढला होता. तीन ते चार लाख मतांनी विजयी होऊ, असा आत्मविश्वास त्यांना होता. सांगलीतील जनतेने षड्यंत्र ओळखले. तेव्हापासून खासदारांचा मूड खराब झाला. सांगलीत भाजप कमकुवत झाली आहे. उमेदवारही कमजोर दिला. अशावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून अपेक्षा ठेवली. त्यांच्या दिलदार शत्रूप्रमाणे इतरांनी मदत करावी, अशी अपेक्षा बाळगली. ते झाले नाही. त्यातूनच ते काँग्रेस नेत्यांवर टीका करताहेत.

विश्वजीत कदम यांच्याशी दोस्ती अतूटविशाल पाटील म्हणाले, आमदार विश्वजीत कदम यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी काम केले. त्यांच्या पाठीशी दादाप्रेमी जनता उभी आहे. आमची एकी अभेद्य आहे. माझा दोस्त दिलदार आहे, ही दोस्ती आता तुटणार नाही. खासदार त्यांना धमक्या देत आहेत. पण, त्यांना मी आश्वस्त करतो मी तुमच्या पाठीशी कायम उभा राहून अडचणीत धावून येईन.

चंद्रहार यांच्याबद्दल मला सहानुभूतीविशाल पाटील म्हणाले, चंद्रहार पाटील यांचा जिल्ह्यातील एका राजकीय डावात बळी गेला. त्यांच्याबद्दल मला सहानुभुती आहे. एका शेतकऱ्याच्या मुलाचे नुकसान होऊ नये, अशी आमची भावना होती. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सर्वप्रथम याबाबत भिती व्यक्त केली होती. पण, खासदारांच्या दिलदार शत्रूच्या चौकडीने ठरवून चंद्रहार पाटील यांचा वापर केला.

हतबलतेमुळे माझे फोटो व्हायरलखासदारांकडे चांगले काही सांगण्यासारखे नव्हते. सर्व खेळ्या अपयशी ठरल्यानंतर हतबलतेपोटी त्यांनी माझे काही फोटो व्हायरल केले. फेक न्यूज फिरवल्या. त्याविरोधात आम्ही तक्रारही दाखल केली आहे, असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.

तुम्ही कधी युतीधर्म पाळला?विश्वजीत यांना आघाडीधर्म शिकवणाऱ्या संजयकाकांनी कधीच युतीधर्माचे पालन केले नाही. विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदेला त्यांनी काय केले, हे पक्षालाही माहित आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते कोणाच्या गाडीतून फिरत होते, हेही जनतेला माहित आहे, असे विशाल पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :vishal patilविशाल पाटीलsangli-pcसांगलीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४