शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

फेरतपासणीत ९२ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल, शिवाजी विद्यापीठाबद्दल असंतोष 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 12:49 PM

राज्यपालांसह, विद्यापीठ अनुदान आयोगाकडे तक्रार

सांगली : गत वर्षात उन्हाळी आणि हिवाळी सत्रात विविध परीक्षा पार पडल्या. यातील ३८ अभ्यासक्रमांच्या एकूण १५ हजार ७९७ विद्यार्थ्यांनी त्यांच्या गुणांच्या फेरतपासणीकरिता शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ९२ टक्के म्हणजेच १४ हजार ६२६ विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीच्या कारभाराबाबत रिपब्लिकन स्टुडंटस् युनियनने राज्यपाल तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.युनियनचे प्रमुख अमोल वेटम यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, फेरतपासणीत एकूण अर्जाच्या ९२ टक्के विद्यार्थ्यांच्या गुणात बदल (कमी अथवा ज्यादा) होत असेल तर उत्तरपत्रिकेच्या तपासणीच्या पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेतील शिक्षकांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. शासन निर्णय २०१८नुसार सीएचबी (तासिका तत्त्वावरील) शिक्षकांना पेपर तपासणी व यासंबंधित कोणतीही कामे देता येणार नाही, असा स्पष्ट आदेश असताना प्रत्यक्षात याच शिक्षकांना पेपर तपासणी, फेरतपासणीबाबत कामे दिली जातात. हे पेपर तपासणी तसेच शिक्षकांच्या नियुक्तीबाबतची माहिती ‘माहिती अधिकार कायद्याखाली’ जाणीवपूर्वक देण्यात येत नाही.पहिल्या परीक्षकाने उत्तरपत्रिका तपासल्यानंतर पुन्हा दुसऱ्या परीक्षकाकडून तपासणी होते. या दोन्ही परीक्षकांमधील गुणदानात फरक असतो. जर फेरतपासणीत मार्क्स वाढले तर याचा फायदा विद्यार्थ्यांना दिला जातो. मात्र, मार्क्स कमी झाले तर विद्यार्थ्यांचे नुकसान केले जाते. हा अन्याय आहे. विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी झाले असल्यास फेरतपासणीच्या आधी दिलेले गुण ग्राह्य धरून त्याचा फायदा देण्याची गरज आहे. काही प्रकरणांत एक-दोन गुणांमुळे विद्यार्थ्यांना नापास केले आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांना कोट्यवधीचा भुर्दंडकोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील २६ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी स्वत:च्या उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीची परीक्षा मंडळाकडे मागणी केली होती.फोटोकॉपीकरिता १५० रुपये, तर फेरतपासणीसाठी ५०० रुपये प्रति पेपर आकारणी केली जाते. यातून जवळपास पावणेदोन कोटी रुपयांचा भुर्दंड विद्यार्थ्यांना सोसावा लागला.

न्यायालयीन आदेशाचा भंगसर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाड्यानुसार सर्व विषयांची फोटोकॉपी माहिती अधिकार कायद्याखाली २ रुपये प्रति पान यानुसार मागविता येते. तरीही विद्यापीठद्वारे एवढी फी आकारणी का केली जात आहे. विद्यापीठाच्या परीक्षा फीपेक्षाही जास्त खर्च फोटोकॉपी आणि फेरतपासणीसाठी होत आहे. यातून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात आहे, अशी टीका वेटम यांनी केली आहे.

कारभाराच्या चौकशीची मागणीउत्तरपत्रिका तपासणीतील दोषप्रकरणाची सखोल चौकशी व कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे वेटम व सुनील क्यातन यांनी राज्यपाल, मुख्य सचिव, मुख्यमंत्री, यूजीसी, बीसीआय यांच्याकडे केली आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठexamपरीक्षा