जत : जत तालुक्यातील अनेक बड्या गावांमध्ये सरपंच पदाच्या आरक्षणात बदल झाला आहे. यामध्ये विशेष करून अटीतटीच्या लढती झालेल्या शेगाव, उटगी, वळसंग, उमराणी, डोर्ली या गावांतील सरपंचपदाचे आरक्षण बदल्याने या ठिकाणी आता कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता लागून आहे. तालुक्यातील ५० टक्के गावांमध्ये या आरक्षणाने महिलाराज येणार आहे.
जत तालुक्यातील १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२५ अखेर ११६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण तहसीलदार सचिन पाटील यांनी शुक्रवारी जाहीर केले. यावेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व ग्रामीण भागातील निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.
यामध्ये संख अनुसूचित जमाती, बोर्गी बुद्रुक अनुसूचित जमाती स्त्री. अंकले, बनाळी, बेवनूर, डोर्ली, करेवाडी (तिकोंडी), रावळगुंडवाडी, वायफळ येथे अनुसूचित जाती. धावडवाडी, एकुंडी, घोलेश्वर, खैराव, रेवनाळ, टोणेवाडी, उटगी येथे अनुसूचित जाती स्त्री. असंगी तुर्क, बेळोंडगी, भिवर्गी, बोर्गी खुर्द, गिरगाव, हळ्ळी, जालीहाळ बुद्रुक, कागनरी, खंडनाळ, खिलारवाडी, नवाळवाडी, सिद्धनाथ, वाळेखिंडी, येळदरी, करेवाडी (को) येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग.
सिंगनहळ्ळी, सोरडी, वाषाण, अचकनहळ्ळी, अमृतवाडी, असंगी (जत), आवंढी, बिळूर, गोंधळेवाडी, गुलगुंजनाळ, कंठी, कासलिंगवाड़ी, कोळगिरी, मुचंडी, निगडी खुर्द, साळमळगेवाडी येथे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री.
अक्कळवाडी, अंकलगी, अंतराळ, बागलवाडी, बागेवाडी, बाज, बालगाव, बसर्गी, बिरनाळ, डफळापूर, दरीबडची, दरीकोनुर, देवनाळ, गुगवाड, गुळवंची, हिवरे, जाडर बोबलाद, करजगी, लमाणतांडा (द. ब.), लवंगा, लोहगाव, मोटेवाडी, पांडोझरी, प्रतापूर, रामपूर-मल्लाळ, सालेकिरी, सनमडी, मायथळ, शेड्याळ, सोन्याळ, तिप्पेहळ्ळी, उमदी-विठ्ठलवाडी, उमराणी, उंटवाडी, गुड्डापूर येथे सर्वसाधारण.
बेळुंखी, धूळकरवाडी, जालीहाळ खुर्द, जिरग्याळ (शेळकेवाडी), काराजनगी, खलाटी, खोजनवाडी, कोणबगी, कोंत्येनबोबलाद (मोटेवाडी), कोसारी, कुडनूर, कुलाळवाडी, कुंभारी, कुणिकोणुर (आबाचीवाडी), लकडेवाडी, लमाणतांडा (उटगी), माडग्याळ, माणिकनाळ, मेंढेगिरी, मिरवाड, मोकाशवाडी, मोरबगी, निगडी बुद्रुक, पांढरेवाडी, शेगांव, सिंदूर, सिंगणापूर, सोनलगी, सुसलाद, तिकोंडी, तिल्याळ, वज़रवाड, व्हसपेठ, वळसंग, येळवी येथे सर्वसाधारण स्त्री आरक्षण आहे.