सांगली - डायग्नोस्टिक सेंटरमध्ये महिलांच्या चेंजिंग रूममध्ये क्ष-किरण तंत्रज्ञाने इंजेक्शनच्या मोकळ्या बॉक्समध्ये मोबाइल कॅमेरा बसविल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी दुपारी एका महिलेच्या प्रसंगावधानतेमुळे उघडकीस आला.संबंधित महिलेच्या पतीने तंत्रज्ञ सूरज गुडूलाल मुल्ला (वय २६, रा. रामकृष्णनगर, कुपवाड, सांगली) याला पकडून बेदम चोप देऊन शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.येथील सिव्हिल चौक परिसरात डायग्नोस्टिक सेंटर आहे. येथे सूरज मुल्ला तपासणीचे काम करतो. तपासणीच्या खोलीजवळ महिला रुग्णांसाठी चेंजिंग रूम आहे. दुपारी शहर परिसरातील एक महिला तपासणीसाठी आली होती. तपासणी झाल्यानंतर ती चेंजिंग रूममध्ये गेली. त्या वेळी कपाटातील इंजेक्शनचा बॉक्स अचानक हलू लागला, तसेच बॉक्समध्ये मोबाइलसारखे व्हायब्रेशन होऊ लागले.महिलेला या बॉक्समध्ये मोबाइल कॅमेरा असल्याचा संशय आला. तिने बाहेर येऊन पतीला हा प्रकार सांगितला.पती चेंजिंग रूममध्ये गेला. त्याने बॉक्स काढून पाहिले असता, त्यामध्ये छिद्र पाडून मोबाइल बसविल्याचे लक्षात आले. हा प्रकार पाहून पतीला धक्का बसला. त्याने मुल्लाला जाब विचारून बेदम चोप दिला.सेंटरमध्ये तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना हा प्रकार समजताच त्यांनीही संतप्तहोत मुल्लाला बेदम चोपदिला. पोलिसांनी मोबाइल कॅमेरा जप्त केला आहे.मोबाईल बसवलापती चेंजिंग रूममध्ये गेला. त्याने बॉक्स काढून पाहिले असता, त्यामध्ये छिद्र पाडून मोबाइल बसविल्याचे लक्षात आले.
डायग्नोस्टिक सेंटरच्या चेंजिंग रूममध्ये कॅमेरा, सांगलीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 4:33 AM