सुमित जिनपाल पाटील (वय २८), दीपक रावसाहेब मलमे (३५), देवगोंडा कुमगोंडा पाटील (४०), सूरज अजिज मुजावर (२१, सर्व रा. समडोळी), साहिल लियाकतअली खान (१९), सागर प्रकाश माने (२७, दोघे रा. इनाम धामणी), रहिम हुसेन शेख (१९, रा. अंकली) व किरण रवींद्र वसट्टी (२७, रा. बामणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पोलिसांनी संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. गावात दुचाकीवरून विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार समडोळी, बामणी, धामणी व अंकली येथील तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे सर्वजण विनामास्क दुचाकीवरून फिरत असल्याचे आढळून आले होते. त्यांच्यावर संचारबंदी कलमाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.