शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

सहकारी संस्थांच्या संचालकांची भूमिका तपासावी

By admin | Published: January 22, 2016 12:14 AM

विजयसिंह मोहिते-पाटील : ‘सहकारतपस्वी गुलाबराव पाटील’ पुरस्काराने सन्मान

सांगली : बरखास्त किंवा अडचणीतील सहकारी संस्थांच्या संचालकांवर कारवाई करण्यापूर्वी, निर्णयांमागील त्यांची भूमिका तपासायला हवी. कोणत्या उद्देशाने निर्णय घेतले गेले, याचाही शोध घेतला पाहिजे. सरसकट कारवाईचा निर्णय योग्य नाही, असे मत माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी गुरुवारी येथील कार्यक्रमात व्यक्त केले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्यावतीने आ. जयंत पाटील, पतंगराव कदम यांच्याहस्ते त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बँकेमार्फत पुरस्कार प्रदान सोहळाही त्यांच्याहस्ते पार पडला. यावेळी मोहिते-पाटील बोलत होते. ते म्हणाले की, सहकारी चळवळीची सक्षम जडणघडण सांगली जिल्ह्यात झाली. अनेक दिग्गज नेत्यांचे योगदान या चळवळीला लाभले. सांगलीसह सातारा जिल्ह्यातही सहकारी संस्था भक्कमपणे उभ्या राहिल्या. या दोन्ही जिल्ह्यांनी सहकारात राज्याला दिशा देण्याचे काम केले आहे. सहकारी संस्थांच्या बरखास्त मंडळाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. कोणतीही कारवाई करताना किंवा धोरण ठरविताना सहकारी संस्थांच्या संचालकांना सरसकट दोषी धरणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. आ. पतंगराव कदम म्हणाले की, देशातील एकूण सहकारापैकी पन्नास टक्के सहकार महाराष्ट्रातच आहे. संस्था उभारण्यासाठी आणि त्या टिकविण्यासाठी पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधी खर्ची घालण्यात आला आहे. संस्था मोडीत काढायला वेळ लागत नाही. कोणताही निर्णय घेताना ही सहकार चळवळ टिकली पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. नव्याने कायदे करण्याची गरज नाही. जयंत पाटील म्हणाले की, जिल्हा बँकेतील संचालक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गुलाबराव पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नि:स्पृहपणे काम केले पाहिजे. जिल्हा बँक आणि राज्य बँकेच्या माध्यमातून गुलाबराव पाटील यांनी सहकाराला एक वेगळी दिशा दिली. त्याच जोरावर या संस्था अधिक सक्षम झाल्या. सांगली जिल्हा बँकेने आता सातारा जिल्हा बँकेशी स्पर्धा करून त्यांच्या बरोबरीला जाण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बाजीराव (नाना) पाटील यांना ट्रस्टच्यावतीने ‘गुलाबराव पाटील ऋणानुबंध’ पुरस्काराने सन्मानित केले. त्यांनीही मनोगत व्यक्त केले. ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी स्वागत, तर बॅँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, संचालक डी. के. पाटील, विक्रम सावंत, बॅँकेचे प्रभारी कार्यकारी संचालक बी. एम. रामदुर्ग आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) माजी सहकारमंत्री म्हणा..! विजयसिंह मोहिते-पाटील यांनी यावेळी ‘जिल्ह्यातील सहकार आणि सहकारावरील नेत्यांचे प्रेम’ या विषयावर मत मांडले. सूत्रसंचालन करणाऱ्याने पतंगरावांचा उल्लेख माजी वनमंत्री असा केल्यानंतर पतंगरावांनी त्यांना माजी सहकारमंत्री असा उल्लेख करण्याची सूचना दिली. यावरून येथील नेत्यांचे सहकारावरील प्रेम दिसून येते, असे त्यांनी सांगितले. पूर्वी जिल्हा बॅँकेची इमारत छोटी होती. त्यावेळी या बॅँकेत फारसा राजकीय संघर्ष नव्हता. नवीन मोठी इमारत झाली आणि याठिकाणचा लोकांचा इंटरेस्ट वाढला, असे मत जयंतरावांनी व्यक्त केले. नापासांचाही सत्कार करा!जिल्ह्यातील चांगल्या सोसायट्या, सचिव आणि शाखांचा गौरव करताना, प्रगतीच्या पातळीवर सर्वात शेवट असणाऱ्या संस्थांचाही पुढील वर्षापासून गौरव करावा. त्यांना मागे राहण्याची त्यामुळे भीती राहील, असे मत जयंत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितांत हशा पिकला.