म्हैसाळ : छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण बहुजन समाजाचे दैवत होते. त्यांनी जुलमी सत्तेविरुद्ध लढून बहुजन समाजाला न्याय दिला, असे विचार शिवभक्त आमदार अमोल मिटकरी यांनी मांडले.
म्हैसाळ (ता. मिरज) येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर, दौलतराव शिंदे-म्हैसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार मिटकरी म्हणाले, शिवरायांच्या सैन्यात अठरापगड जाती-धर्मातील माणसे होती. त्यांच्या पराक्रमानेच स्वराज निर्माण झाले. शिवाजी महाराज म्हणजे ढाल-तलवारच नव्हे, तर युगानुयुगे प्रेरणा देणारे युगपुरुष होते. छत्रपती संभाजीराजे हेसुद्धा शूर, पराक्रमी तर होतेच; पण ते विद्वानही होते. संभाजीराजे हे तर आमचे छावा होते. देशासाठी व मानव समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले अमूल्य आयुष्य खर्ची केले. हे बहुजन समाजाने लक्षात ठेवायला हवे.
यावेळी बाळासाहेब होनमोरे, माजी सरपंच मनोरमादेवी शिंदे, परेश शिंदे, कैलाससिंग शिंदे, नरेंद्र शिंदे, शालिवाहन शिंदे, ए. टी. पाटील, ज्ञिनेश्वर पाटील, भूपाल कोंगनोळे, अनिल कबुरे, नामदेव कोळी, नरसिंह संगलगे, धोंडीराम मगदूम, विराज कोकणे, तानाजी दळवी, वास्कर शिंदे, शिवाजी महाडिक, गंगाधर तोडकर, संताजीराव गायकवाड, महावीर खोत, प्रमोद इनामदार उपस्थित होते. सुशांत घोरपडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रणव पाटील यांनी आभार मांडले.
चाैकट
समाजासाठी प्रेरणा
सांगली जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे. विठोजी चव्हाण हा कर्तबगार सेनानी हे त्या काळातील उत्तम उदाहरण आहे. नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, राजारामबापू पाटील ही अलिकडील कर्तृत्ववान माणसे. यांची प्रेरणा समाजाने घेतली पाहिजे.
फोटो-१७म्हैसाळ१