इस्लामपूर : माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या राजारामबापू शिक्षण व उद्योग समूहास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकाऱ्यांसमवेत शुक्रवारी सकाळी सदिच्छा भेट दिली़ त्यांनी प्रथम साखर कारखाना कार्यस्थळावर बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले़ यानंतर आर.आय.टी.च्या सेमिनार हॉलमध्ये राजारामबापू समूहाच्या प्रगतीचा माहितीपट पाहून समाधान व्यक्त केले़ कारखाना कार्यस्थळावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आ़ सुरेश हाळवणकर, आ़ सुधीर गाडगीळ, आ़ सुरेश खाडे, मकरंद देशपांडे, राजाराम गरूड होते. कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील, उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी स्वागत केले़ यानंतर फडणवीस आऱ आय़ टी़ च्या सेमिनार हॉलमध्ये आले़ तेथे त्यांना समूहातील साखर कारखाना, बँक, दूध संघ, वस्त्रोद्योग, आऱ आय़ टी., कासेगाव शिक्षण संस्था व जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानच्या प्रगतीचा माहितीपट दाखविण्यात आला़ माहितीपट पाहताना फडणवीस यांना आ़ पाटील यांनी माहिती दिली़ (वार्ताहर)शेवट अँटी चेंबरमध्येचइस्लामपूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजकीय भाष्य करायचे टाळले. जयंत पाटील यांच्याकडे दिलेल्या भेटीवेळीही त्यांनी पुतळा अभिवादन ते चित्रफितीची पाहणी अशाच कार्यक्रमाला पसंती दिली. मात्र राजकीय खेळ्या करण्यात माहीर असलेल्या जयंतरावांनी जाता-जाता फडणवीस यांना अँटी चेंबरमध्ये नेलेच. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या. इस्लामपूर येथील आर.आय.टी.च्या सेमिनार हॉलमध्ये शुक्रवारी राजारामबापू समूहाचा माहितीपट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला. त्यांना आमदार जयंत पाटील यांंनी माहिती दिली. मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.
राजारामबापू उद्योग समूहास मुख्यमंत्र्यांची भेट
By admin | Published: August 12, 2016 11:59 PM