शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

बालशिक्षणातील प्रशिक्षक : प्रा. विनोद मोहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 4:24 AM

इन्ट्रो ज्या वयात बालकांना शी-शूचे भान नसते, त्या वयात त्यांना शिक्षण द्यायचे, ही संकल्पनाच नको तितकी मॉडर्न वाटते. पण ...

इन्ट्रो

ज्या वयात बालकांना शी-शूचे भान नसते, त्या वयात त्यांना शिक्षण द्यायचे, ही संकल्पनाच नको तितकी मॉडर्न वाटते. पण इस्लामपूरच्या प्रा. विनोद आणि वर्षाराणी मोहिते या दांपत्याने ती यशस्वी करून दाखविली, इतकेच नव्हे, तर प्ले स्कूलचा आदर्श पॅटर्न तयार केला. ‘मुक्तांगण’ प्ले स्कूल ही चळवळ बनवली. बालशिक्षणातील तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून मोहिते दांपत्य आता महाराष्ट्रभर मार्गदर्शकाच्या भूमिकेत फिरत असते.

मुक्तांगण ही शाळा नव्हे, तर अनुभवघर असल्याचा खुलासा सुरुवातीलाच प्रा. मोहिते करतात. मुंबई विद्यापीठातून २०१० मध्ये विनोद यांनी शिक्षणशास्त्राची पदवी मिळवली. त्यानंतर बालशिक्षणाला वाहून घेतलं. गेली चौदा वर्षे बालशाळांचे अभ्यासक व मार्गदर्शक म्हणून सर्वदूर ओळख निर्माण केलीय. अंगणवाडी सेविका, खासगी प्ले ग्रुप, नर्सरीच्या शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी अखंड कार्यशाळा घेत असतात. कमीतकमी खर्चात अधिकाधिक परिणामकारक उपक्रम कसे घ्यावेत, याचा पॅटर्न त्यांनी तयार केला आहे. दोन ते सहा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या समस्या ओळखण्याचे नेमके कौशल्य अवगत केले आहे. त्यांच्या मुक्तांगण प्ले स्कूल ॲन्ड ॲक्टिव्हिटी सेंटरने स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे, जपला आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरावर नावलौकिक मिळवला आहे. उत्कृष्ट ज्ञानरचनावाद, खेळातून शिक्षण, उपक्रमशीलता, मुलांचे भावविश्व फुलवणारे प्रांगण, त्यांच्या भाषेत संवाद साधणारे अध्यापक यामुळे ‘मुक्तांगण’ खेळघर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र अव्वल ठरले आहे.

विनोद यांनी पदवी मिळवली, पण पुढे काय निश्चित नव्हते. छोट्यांसाठीच काहीतरी करायचे, हे मात्र पक्के ध्यानी होते. त्यातून पत्नी वर्षाराणी यांच्या मदतीने इस्लामपुरात प्रशासकीय इमारतीजवळ जानेवारी २०१० मध्ये मुक्तांगण खेळघर साकारले. इस्लामपुरातील ते पहिलेच ठरले. नवनव्या संकल्पनांमुळे पालकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सध्या साठहून अधिक बालके खेळघरात रमली आहेत. मुलांचे भावविश्व फुलवणारे अंतरंग, बोलका व्हरांडा, सुंदर बगीचा व तितकाच नीटनेटकेपणा पाहणाऱ्यांना आकर्षित करतो. बालशाळेच्या संकल्पनेचा नेमका अभ्यास मोहिते दांपत्याला असल्याचे यातून स्पष्ट होते. मुलांच्या गुणवत्तेसाठी प्रत्यक्ष अनुभवातून दैनंदिन व्यवहाराशी जोडणारे कृतियुक्त शिक्षण कसे देता येईल, यासाठी ते लक्ष देतात.

मुक्तांगणने बालशिक्षण चळवळीला ज्ञानरचनावाद संकल्पनेची भेट दिली आहे, असेच म्हणावे लागेल. ही अनोखी संकल्पना अनुभवण्यासाठी राज्यभरातून अभ्यासक मुक्तांगणमध्ये येऊन गेलेत. मुलांबरोबरच पालकांसाठीही उपक्रम राबविण्याची कल्पकता मुक्तांगणने दाखवलीे. स्वंयशिस्त, स्वयंअध्ययन, स्वावलंबन, सृजनशीलता आणि मुलांच्या बालसुलभ जिज्ञासेवर लक्ष देत उपक्रम राबविले जातात. लोककला आणि भारतीय संस्कृती मुलांवर बिंबवण्याचा प्रयत्न केला जातो. मुक्तांगणमध्ये ते शिकायला आलेत, ही बोजड भावनाच मागे ठेवली जाते. मुलांच्याच शब्दात मनसोक्त गप्पांमधून संवाद साधला जातो. ही शाळा नव्हे, तर खेळघर आहे, हे जाणवलेली मुले घरी परतायलादेखील मागत नाहीत, असा अनुभव प्रा. मोहिते यांनी सांगितला. याचे नेमके प्रशिक्षण देण्यात त्यांचा हातखंडा आहे.

मुक्तांगणमध्ये काय नाही? शेती आहे, बागबगीचा आहे, कुंभारवाडा, बाजार, रेल्वे स्टेशन, भाजीमंडई, जनावरांचा बाजार, पाऊस, गणेशोत्सव, फळे-फुले, प्राणी, किल्ला या साऱ्यांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. मातीतून मूर्ती साकारताना अनुभवायला मिळते. आंब्याच्या कोयीपासून रोपांची निर्मिती पहायला मिळते. शेतात वेलीला द्राक्षे कशी लागतात, हेदेखील अनुभवायला मिळते. यामुळे बालमनातील असंख्य प्रश्नांची उकल मुक्तांगणमध्येच होते. मुक्तांगणमधील खेळण्यांची व वस्तूंची कुतूहलाने मुलं हाताळणी करतात. प्रश्नांची सरबत्ती करून जिज्ञासा शमवतात. यामुळे त्यांच्या बुद्धीला चालना मिळते. मुलांशी अखंड संवाद साधून भाषाविकास साधला जातो.

सुजाण पालकत्व कसे असावे, याची माहिती देणारी पाचशेहून अधिक पुस्तके मुक्तांगणच्या वाचनालयात आहेत. नव्या जमान्यात मुले मागे पडू नयेत, यासाठी ई-लर्निंग उपलब्ध केले आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबर खेळातही कौशल्य वाढावे, यासाठी जाणीवपूर्वक उपक्रम राबवले जातात. यामागे संकल्पना असते ती प्रा. विनोद मोहिते यांची. त्यांच्या नवकल्पनांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. चक्क ‘आयएसओ’ मानांकन मिळवणारे कदाचित हे पहिलेच प्ले स्कूल असावे. शैक्षणिक गुणवत्ता, उपक्रमशीलता, पालकांचा प्रतिसाद, बालपण टिकविण्यासाठीचे विविध प्रयत्न, प्रत्यक्ष अनुभव व खेळातून दिले जाणारे शिक्षण आणि पालकत्वाचे प्रबोधन या गुणांच्याआधारे मुक्तांगणने ‘आयएसओ’वर मोहोर उमटवली आहे.

केंद्र सरकारच्या शैक्षणिक धोरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नवी दिल्लीस्थित प्राईम टाइम शैक्षणिक संशोधन संस्थेने ‘सर्वोत्कृष्ट प्ले स्कूल’चा पुरस्कार मुक्तांगणला देऊन २०१९ मध्ये गौरविले आहे. दरवर्षी राज्यभरातील अडीचशे ते तीनशे शिक्षिका मुक्तांगणला भेट देतात. आरोग्य, नातेसंबंध, सुरक्षितता, पर्यावरणाच्या ॲक्टिव्हिटी यातून मुलांचे व्यक्तिमत्त्व कसे आकाराला येते, याचे धडे घेतात. सांगली, सातारा जिल्ह्यांतील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये प्रा. मोहिते गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन करत आहेत. मुक्तांगणच्या प्रत्येक संकल्पनेत मातोश्री सरोजिनी यांचा ठसा असल्याचे प्रा. मोहिते आवर्जून सांगतात. मुख्याध्यापिका म्हणून निवृत्तीनंतर त्यांनीही मुक्तांगणमध्ये लक्ष घातलेय. उद्याच्या गुणवंत पिढीसाठी मोहिते कुटुंब अहोरात्र परिश्रम घेतेय.

-------------------