लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जादुई दुनियेचे विलक्षण आकर्षण असलेल्या बच्चे कंपनीने शनिवारी सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात हाऊसफुल्ल प्रतिसाद देत सुंदर सफरीचा आनंद लुटला. जादूगार जितेंद्र रघुवीर यांच्या जादूच्या एकापेक्षा एक प्रयोगांनी थक्क होत बालचमूंनी अक्षरश: जल्लोष केला.बच्चे कंपनीची शनिवारची सुटी द्विगुणित करण्याची संधी ‘लोकमत’ बाल विकाच मंचने करुन दिली. जादूगार यांच्या ‘मॅझिक शो’ने लहान मुलांसह पालकांनाही काही काळ तणावाचे क्षण विसरायला लावले. एक से बढकर एक जादूच्या विलक्षण प्रयोगांमुळे आणि त्यामधील हलक्या-फुलक्या विनोदी पेरणीमुळे हा कार्यक्रम बालमनावर मोहिनी टाकून गेला.कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. यावेळी चाटे शिक्षण समूहाचे प्रशासकीय प्रमुख संजय दळवी, इनचार्ज निखिल पाटील, दिग्विजय पवार, हॉटेल सौरभ- ३ चे संचालक शैलेश पवार उपस्थितहोते.जादूगार रघुवीर यांनी शनिवारी वेगवेगळ्या प्रयोगांबरोबरच मुलांना जादू शिकविण्याचे प्रशिक्षणही दिले. यामध्ये भूतनी बॉक्स, मिस्ट्रियस सिलिंडर फ्रॉम सिंगापूर, रुबिक्स, क्युब गेम शो, मास्टर आॅफ पेडिशन, एकाच बॉक्समधून अनेक वस्तू, शून्यातून विश्वाची निर्मिती, अरेबिक जादू, पत्त्यांचे प्रयोग, रुमालाचे हवेतील नृत्य, मानेतून तलवार आरपार असे जादूचे विविध प्रयोग सादरकेले.‘लोकमत’ बाल विकास मंचतर्फे बालचमूंसाठी दर महिन्याला विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून २०१७ च्या सदस्य विद्यार्थ्यांसाठी मॅजिक शोचे आयोजन करण्यात आले होते.सबस्क्रिप्शनसाठी दोन दिवस‘लोकमत’ बाल विकास मंचच्या सबस्क्रिप्शनसाठी अखेरचा दोन दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. १५० रुपयांच्या सबस्क्रिप्शन फीमध्ये तात्काळ २४५ रुपयांचा लंच बॉक्स, नॉलेज बुक, ओळखपत्र, सातशे रुपयांची हमखास भेटवस्तू यासह १ लाख १० हजार रुपये किमतीच्या भाग्यवान सोडतीचा समावेश आहे.
जादुई नगरीत बच्चे कंपनीचा जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 11:15 PM