विकास शहा
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा शहरात अंबामाता मंदिर परिसरातील बगिचा सोडला तर एकही लहान मुलांना खेळण्यासाठी जागा नाही याचा विचार करून नवजीवन वसाहत येथे लोक सहभागातून उभारला छोटासा बगिचा तयार करण्यात आला आहे. या बगिच्यात लहान मुलांना सामान्य ज्ञानाची माहिती देणारे फलक ही लावण्यात आले आहेत.
शासकीय मोकळी जागा दिसली की ती आपणास कशी मिळेल याकडेच अनेकांचे लक्ष असते मात्र दूरध्वनी कार्यालयासमोर असणाऱ्या नगरपंचायतच्या जागेत एक छोटा पण आदर्श ठरेल असा बगिचा तयार करण्यात आला आहे. या बगिचामध्ये लहान मुलांना सामान्य ज्ञानाची माहिती मिळावी म्हणून डिजिटल फलक लावून त्यावर विविध विषयांवर माहिती दिली आहे तसेच लॉन, झाडे, बसण्यासाठी बाकडी व वाचण्यासाठी पेपर ठेवले आहेत. यासाठी अनेक लोकांनी छोट्या मोठ्या स्वरूपात आर्थिक व लागणाऱ्या वस्तू स्वरूपात मदत केली आहे.
या बगिच्यासाठी अवधूत इंगवले, वाहिद खान, राहुल गायकवाड, गजानन पाटील, विशाल लोहार, अक्षय सुतार, रायशिंग कांबळे, करण परदेशी, धनाजी कोळेकर, राहुल परदेशी, कपिल लोहार, अभिजीत पाटील, कीर्ती लोहार, मंगेश लोहार, सूरज तांदळे, विनायक लोहार, पंकज हवालदार, संदीप इंगवले, विवेक लोहार, सागर पाटील, सिद्धर्थ कदम, गणेश भस्मे, सोमनाथ सुतार, अभय लोहार, ओंकार पालसंडे, विक्रम लोहार, शाहरूख मुल्ला, मुकेश लोहार, साहिल मुल्ला, सद्दाम मुल्ला, योगेश पाटील, योगेश सवाइराम, अलंकार घोलप, गौरव लोढे, अमोल कांबळे, युवराज पाटील, वसंत कुंभार, सागर कुंभार, अक्षय ठाकर यांनी परिश्रम घेऊन हे काम केले आहे.
याचबरोबर माजी बालकल्याण सभापती सुजाता इंगवले, नगराध्यक्षा सुनीता निकम, उपनगराध्यक्ष विजय दळवी, मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी या ठिकाणी पाणी, वीज आदी व्यवस्था करण्यासाठी मदत केली आहे. सर्वांनी आदर्श घ्यावा असा हा बगिचा ठरेल हे नक्की.