शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

मतकुणकीत वादळी वाऱ्याने घेतला चिमुकलीचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 2:12 PM

मतकुणकी (ता. तासगाव) येथे वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले, त्यासोबत पत्र्याच्या अँगलला बांधलेला पाळणाही चिमुकल्या बाळासह उडून, चारशे फूट लांब जाऊन पडला. या दुर्घटनेत नंदिनी संजय शिरतोडे (वय ४ महिने) या बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. बालिकेच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देमतकुणकीत वादळी वाऱ्याने घेतला चिमुकलीचा जीवपत्र्यासह पाळणा उडाला : परिसरात हळहळ

कवठेएकंद : मतकुणकी (ता. तासगाव) येथे वादळी वाऱ्याने घरावरील पत्रे उडाले, त्यासोबत पत्र्याच्या अँगलला बांधलेला पाळणाही चिमुकल्या बाळासह उडून, चारशे फूट लांब जाऊन पडला. या दुर्घटनेत नंदिनी संजय शिरतोडे (वय ४ महिने) या बालिकेचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. बालिकेच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मतकुणकीतील कवठेएकंद-चिंचणी रस्त्यानजीक विश्वनाथ शिरतोडे पत्नी, मुलगा, सून व तीन नाती यांच्यासह राहतात. त्यांचा मुलगा संजय यांना चार महिन्यांपूर्वी नंदिनी ही तिसरी मुलगी झाली होती.

सोमवारी सायंकाळी जोरदार वारे सुटले. त्यावेळी सर्वजण घरात होते. मात्र काही कळण्याच्या आतच जोरदार वारे घरात शिरले आणि घराचा पत्रा वाऱ्यासह उडून गेला. या पत्र्याच्या अँगलला दोरीने पाळणा बांधला होता. पाळण्यात नंदिनी होती. अँगल व पत्र्यासह पाळणा तब्बल चारशे फूट अंतरावर जाऊन पडला.

पाळणा पत्र्याखाली दबली गेल्याने नंदिनी गंभीर जखमी झाली होती. घरच्यांनी धावत जाऊन तिला उचलून घेतले व तात्काळ तासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले होते. पण तिची प्रकृती गंभीर असल्याने सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण रात्री साडेअकराच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मंगळवारी घटनास्थळी आमदार सुमनताई पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, पंचायत समिती सभापती शुभांगी पाटील, मंडल अधिकारी प्रवीण माळवे, तलाठी लोणकर, सरपंच नेताजी पाटील, सजेर्राव पाटील, शिराज मुजावर आदींनी भेट दिली.आईचा आक्रोशवारे सुरू झाले तेव्हा चिमुकल्या नंदिनीला तिची आई नीता आपल्याकडे घेणार होती. तोपर्यंत वारे घरात घुसून काही कळण्याअगोदरच अँगल व छतासह पाळणा उडून गेला. छताखाली पाळणा दबला जाऊन चिमुकलीचा अंत झाला. घटनास्थळी आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घरामध्ये सगळे असतानाही वादळापुढे हतबल व्हावे लागले आणि क्षणात चिमुकलीला गमवावे लागले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली