कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भागात तुंग आणि कवठेपिरान या दोन मोठ्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज माघारीनंतर दोन्हींकडे दमदार पॅनेल लागली आहेत. तुंगमध्ये सत्ताधारी काँग्रेस, ‘स्वाभिमानी’च्या विरोधात राष्ट्रवादीसह सगळे विरोधक एकत्र आले आहेत. त्याचप्रमाणे कवठेपिरानमध्ये समझोत्याचे सगळे प्रयत्न फोल झाल्याने राष्ट्रवादीने पॅनेल लावून सलामी दिली आहे. राष्ट्रवादीप्रणित पॅनेलला परिसरातील सर्व नेत्यांनी साथ दिली आहे.
तुंगमध्ये गेली दहा वर्षे वसंतदादा कारखान्याचे माजी संचालक सचिन डांगे यांची सत्ता आहे. त्यांना डांगे, दळवी, वाईंगडे यांच्यासह मातब्बरांची साथ आहे. त्यांनी गावांत विविध योजना राबवून, नेत्यांच्या संपर्कात राहून गावचा विकास केला. तरुणाईची मोठ्या प्रमाणावर त्यांना साथ मिळाली. या विकासकामांच्या जोरावर ते निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी, पाटील गट कदम गट आणि काही प्रमाणात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन पॅनेल केले आहे. त्यांना ‘मोठ्या नेत्यांनी’ पाठबळ दिले आहे पाच वाॅर्ड दोन पॅनेल आणि ३० उमेदवार आहेत.
कवठेपिरान हे हिंदकेसरी मारुती माने यांचे एक मोठे चर्चेतील गावागावांत वर्षानुवर्षे हिंदकेसरी मारुती माने आणि त्यांच्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांचे मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड होत असे. गत निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल लागले; पण हाती काहीच लागले नाही. म्हणून यावेळी वाद टाळून ‘बिनविरोध’साठी प्रयत्न केला गेला पण जागावाटपाचा समझोता झाला नाही आणि सहा वाॅर्ड आणि १७ जागांसाठी ३४ जण रिंगणात उभे ठाकले आहेत
महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही गावे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मतदारसंघात आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत नाही याची मोठीं खंत आहे. त्यामुळेच. पॅनेल उभे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खलबते झाली. इस्लामपूर मतदारसंघातील आणि विशेषकरून मिरज पश्चिम भागात राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही ठिकाणी निवडणुकीत उतरली आहे त्यामुळे या निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
फाेटाे : सचिन डांगे(तुंग)
फाेटाे : भीमराव माने(कवठेपिरान)
जयंत पाटील यांचा फोटो वापरणे,बातमी सविस्तर घेणे