शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

अंगणवाडी सेविकांचे सांगलीत चटणी-भाकरी आंदोलन, शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा

By अशोक डोंबाळे | Published: February 28, 2023 3:31 PM

जिल्ह्यातील सेविकांसह पाच हजार मदतनीसांचे आठवड्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन

सांगली: जिल्ह्यातील सेविकांसह पाच हजार मदतनीसांचे आठवड्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु आहे. तरीही शासन दखल घेत नसल्याच्या निषेधार्थ अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयसमोर मदतनीसा, सेविकांनी चटणी भाकर आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त केला.किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. सेविका, मदतनीसांनी मानधनात वाढ, पोषण ट्रॅकर अ‍ॅप मराठीत करणे, नवीन मोबाइल, ग्रॅच्युइटी लागू करणे, आहार आणि इंधनाचे दर वाढवणे आदी मागण्यांकडे राज्य सरकार दोन वर्षांपासून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आंदोलन सुरु केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे अंगणवाडी सेविका दररोज वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. आधी थाळी नाद आंदोलन त्यानंतर लाटणे दाखवून आंदोलन करण्यात आले. मंगळवारी चटणी भाकरी हातात घेऊन अनोखे आंदोलन केले. लोकांच्या मुलांना कुपोषणापासून दूर ठेवण्यासाठी अंगणवाडी सेविका काम करत असतात. मात्र केवळ आठ हजार रुपयांच्या मानधनात घर चालवताना त्यांच्या स्वतःच्या मुलांवर कुपोषणाची वेळ आली आहे. या अंगणवाडी सेविका आपल्या घरात चटणी भाकरच खातात. तेच दाखवण्याचा प्रयत्न आंदोलनाच्या निमित्ताने केल्याची प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांनी दिली आहे.आंदोलनात शोभा कोल्हे, अरूणा नांगरे, आशा माळी,  रेखा पाटील,  शुभांगी कांबळे, संतोषी जाधव आदीसह हजारो सेविका, मदतनीसा भर उन्हात सहभागी होत्या.

टॅग्स :Sangliसांगली