शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
3
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
4
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
5
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
6
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
7
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
8
अजित पवारांच्या मनात नेमकं काय?; भरसभेत रोहित पवारांचं कौतुक केल्यानं संभ्रम
9
Bigg Boss 18 : सलमान खान टीव्हीचा सर्वात महागडा होस्ट? फीस जाणून थक्क व्हाल!
10
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव
11
Mumbai Best Bus Accident: "तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना!
12
नवव्या वर्षी वडिलांच छत्र हरपलं! कुस्ती, वाद, प्रसिद्धी अन् आमदार; वाचा विनेश फोगाटचा प्रवास
13
Video - 'वडापाव गर्ल'नंतर आता 'मॉडेल चहावाली' झाली फेमस; डॉली चहावाल्याला देतेय टक्कर
14
मिशन विधानसभा! सोलापूर जिल्ह्यासाठी शरद पवारांकडून ६१ नेत्यांच्या मुलाखती; दोन चेहऱ्यांनी लक्ष वेधलं
15
"या अनपेक्षित निकालाने..."; हरयाणातल्या पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
16
"मी तिला मारलं नसतं तर तिने मला..."; महालक्ष्मीचे ५० तुकडे करणाऱ्याच्या नोटमध्ये धक्कादायक दावा
17
शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?
18
'या' दिवशी गुंतवणूकीसाठी खुला होणार देशातील सर्वात मोठा IPO; प्राईस बँड किती? ग्रे मार्केट प्रीमिअम देतोय टेन्शन
19
खळबळजनक! IPS अधिकाऱ्याचं लोकेशन ट्रॅक करणाऱ्या ७ पोलिसांचं निलंबन, काय आहे प्रकार?
20
ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- "सहा महिने एसटी आंदोलन..."

सांगलीतील चिखलात रुतलेल्या रस्त्याला नागरिकांची श्रद्धांजली; नेते, अधिकाऱ्यांच्या नावाने बोटे मोडत संताप 

By अविनाश कोळी | Published: October 04, 2023 4:38 PM

सांगली : ‘सहा महिने मृत्यू पावलेल्या खड्ड्याला समस्त नागरिक, विद्यार्थी व व्यापाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली’ अशा आशयाचा फलक लावत ...

सांगली : ‘सहा महिने मृत्यू पावलेल्या खड्ड्याला समस्त नागरिक, विद्यार्थी व व्यापाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली’ अशा आशयाचा फलक लावत सांगलीतील नागरिकांनी खड्ड्यांत व चिखलात रुतलेल्या रस्त्याला श्रद्धांजली वाहिली. लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी यांच्या नावाने बोटे मोडत नागरिक, विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.येथील चांदणी चौक, दमाणी हायस्कूल परिसरातील रस्ता गेल्या चार महिन्यांपासून उकरून ठेवला आहे. परिसरातील सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना गेल्या चार महिन्यांपासून गटारीच्या पाण्यातून, चिखलातून, खाचखळग्याच्या उकडलेल्या रस्त्यातून ये-जा करावी लागत आहे. तत्कालीन महापौर व सर्व नगरसेवकांना वारंवार सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. काही दिवसांपूर्वी गणेश मंडळांनाही या खराब रस्त्यावरच प्रतिष्ठापना करावी लागली होती. प्रशासकीय काळातही या रस्त्याकडे कोणी पाहिले नाही. ठेकेदाराने काम बंद केले आहे.याचा संताप व्यक्त करीत प्रभाग क्रमांक सतरामधील नागरिक, महिला व शाळेच्या मुलांनी रस्त्यासह प्रभाग, सर्व प्रशासकीय अधिकारी, पुढाऱ्यांना श्रद्धांजली वाहत शंखध्वनी करीत संताप व्यक्त केला आहे. तशा आशयाचा मोठा फलकही झळकविण्यात आला. यावेळी महेश दासानी, रावसाहेब पाटील, महेश दरूरमठ, सतीश डांगे, किरण चव्हाण, प्रदीप मोर्चे, नीलेश स्वामी, आकांक्षा चौकीमठ, सुनील चौकीमठ, प्रकाश स्वामी, सुनील चौधरी, निखिल दामाणी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली