सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज सांगलीत मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळपासून संपूर्ण शहरात मोर्चाचे वातावरण असून आता संपूर्ण जिल्ह्यातून नागरिक येण्यास सुरुवात झाली आहे.
शहरातील विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. तिथून हा मोर्चा गेस्ट हाऊस, कर्मवीर चौक ते राम मंदिर चौकात जाणार आहे. त्याठिकाणी काही तरुण मनोगत व्यक्त करणार आहेत. सकाळी नऊ पासूनच मराठा बांधव विश्रामबाग येथे जमण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील विविध भागात पार्किंगची सोय करण्यात आली आहे. विविध राजकीय पक्षांचे नेतेही याठिकाणी दाखल झाले आहेत.