शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

sangli news: मंत्री सुरेश खाडेंच्या गावचेच नागरिक विकास कामांवरुन नाराज, ग्रामस्थांची निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 2:02 PM

ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी

दत्ता पाटीलसांगली : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या मूळ गावी तासगाव तालुक्यातील पेड याठिकाणी ग्रामस्थांनी निदर्शने केली. गावात मंत्री खाडे यांचीच सत्ता आहे. मात्र गावातील विकास कामांबाबत गावातील ग्रामस्थ नाराज असल्याने या ठिकाणी ग्रामस्थांनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.पेड गावामध्ये वरची गल्ली याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून सांडपाण्याची व्यस्था नसल्याने ग्रामस्थ  आक्रमक झालेले दिसून आले. यामुळे आज पेड येथील ग्रामपंचायतीवर आंदोलन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी गावातील तासगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रभाकर पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास पाटील, ग्रामपंचायतिचे सदस्य राजेंद्र शेंडगे, पेड मल्हारराव वि.वि.कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन विजय शेंडगे, अभिजत शेंडगे, विश्वास शेंडगे, अविनाश शेंडगे आदी  उपस्थित होते.पेड हे साधारणपणे नऊ हजार लोकसंख्येचे गाव. याठिकाणी बऱ्याच भागामध्ये गटारी नाहीत. मागील पंचवार्षिक काळात सुरेश खाडे यांचे मोठे बंधू कै. दत्तू खाडे हे या गावचे सरपंच होते. यावेळी गावात मोठी विकास कामे झाली. दत्तू खाडे यांनी गावातील बहुतांश गटारींची कामे केली होती. मात्र काही भागात गटारी त्यांना पूर्ण करता आल्या नाहीत. दरम्यान दत्तू खाडे यांचा काही दिवसांनी मृत्यू झाला. त्यानंतर लोकांच्या समस्या जैसे थे  राहिल्या. याबाबात वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार येथील ग्रामस्थांनी केले. निवेदने देण्यात आली.मात्र प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. आता संतप्त  ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतल्या नंतर प्रशासन घडबडून जागे झाले. आंदोलनाच्या एक दिवस आधी आंदोलकांना भेटून दोन महिन्याचे गटारींचे काम पूर्ण करू असे लेखी पत्र देण्यात आले. या पत्रामुळे आंदोलकांनी ग्रामपंचतीवर चिखलफेक न करता फक्त घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करत आंदोलन केले. येत्या दोन महिन्यात गटाराचे काम पूर्ण झाले नाही तर, तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी अभिजित शेंडगे यांनी दिला.

टॅग्स :Sangliसांगली