सांगली : देशाच्या फाळणीवेळी झालेल्या जखमा भरण्याची गोष्ट चांगली, पण जुन्या जखमा भरताना नवीन जखमा होणार नाहीत, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे, असे मत व्यक्त करीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. अमोल कोल्हे यांनी रविवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून भाजपला टोला लगाविला.सांगलीवाडी येथे प्रकाशदादा मोहिते यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त चौक नामकरण, स्मरणिका प्रकाशन व प्रतिमा अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून खा. कोल्हे बोलत होते. यावेळी भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, उद्योजक काकासाहेब चितळे उपस्थित होते.कोल्हे म्हणाले की, लोकसभेवेळी जनतेने वेगळा विचार केला असता, तर आज देशाला वेगळे वळण लागले असते. नागरिकत्व दुरूस्ती विधेयक संसदेत पास होत असताना, माझ्या मनात अनेक प्रश्न होते. फाळणीवेळी या देशाला मोठ्या जखमा झाल्या. त्या भरून काढणे चांगली गोष्ट आहे. पण त्यातून नवीन जखमा होणार नाहीत, याची खबरदारी घेतली पाहिजे.
नागरिकत्व कायद्याने नवीन जखमा होऊ नयेत : अमोल कोल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 5:31 PM
देशाच्या फाळणीवेळी झालेल्या जखमा भरण्याची गोष्ट चांगली, पण जुन्या जखमा भरताना नवीन जखमा होणार नाहीत, याचे भान राज्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे, असे मत व्यक्त करीत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. अमोल कोल्हे यांनी रविवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून भाजपला टोला लगाविला.
ठळक मुद्देनागरिकत्व कायद्याने नवीन जखमा होऊ नयेत : अमोल कोल्हे प्रकाशदादा मोहिते यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त चौक नामकरण