सांगली : येथील मदनभाऊ पाटील युवा मंचच्या शहर व ग्रामीण कार्यकारिणीच्या निवडी पार पडल्या. नूतन पदाधिकाऱ्यांना जयश्रीताई पाटील यांच्याहस्ते निवडीचे पत्रे देण्यात आली.
जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे यांनी स्वागत केले. जयश्रीताई पाटील म्हणाल्या की, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सामाजिक कार्य करताना पाठबळ हेच युवा मंचचे उद्दिष्ट आहे. ९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण याच सूत्रांनी युवा मंचची सोळा वर्षे वाटचाल चालू आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी इथून पुढेही त्यांनी काम करत रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी माजी अध्यक्ष अजित सूर्यवंशी, रत्नाकर नांगरे, संतोष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले
निवडी खालीलप्रमाणे - सांगली शहराध्यक्ष मयूर बांगर, सांगली शहर ओबीसी सेल अध्यक्ष जुनेद महात, शहर उपाध्यक्ष दिनेश सादिलगे, सचिन माने, महापालिका क्षेत्र अध्यक्ष तौफिक बिडीवाले, उपाध्यक्ष अक्षय दोडमणी, उस्मान शेख, मिरज शहराध्यक्ष तौफिकअहमद कोतवाल, मिरज तालुकाध्यक्ष सुजित लकडे, उपाध्यक्ष प्रथमेश भंडे, जिल्हा उपाध्यक्ष शेखर पाटील, ग्रामप्रमुख - ज्ञानेश्वर पाटील (कर्नाळ), नितीन भगत (बिसूर), रामचंद्र खुट्टे (बुधगाव), भारत खवाटे (अंकली), बाहुबली लठ्ठे, उपग्रामप्रमुख, राहुल कोळी (जुनी धामणी), रोहित कोळी, उपग्रामप्रमुख, प्रमोद कोरे (इनाम धामणी), राहुल मोरे (पद्माळे), अजय पवार (माधवनगर), सचिन पाटील (खोतवाडी), अमित शिंदे उपग्रामप्रमुख.