शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सज्ज! शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह
2
११५ जणांच्या नावांची शिफारस, दिल्लीत बैठकांचे सत्र; आज किंवा उद्या भाजपाची पहिली यादी येणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "राणे कुटुंबीयांचा त्रास, लोकसभा, विधानसभा...";राजन तेलींनी आरोप करत घेतला मोठा निर्णय
4
खळबळजनक! पोस्ट ऑफिसमधील १५०० लोकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये झाले गायब अन्...
5
Wipro Bonus Shares : चौदाव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' दिग्गज आयटी कंपनी; घोषणेनंतर शेअरमध्ये जोरदार तेजी
6
जीम करताय? मग प्राजक्ता माळी काय सांगतेय ते एकदा ऐकाच, म्हणाली- "AC मध्ये व्यायाम केल्याने..."
7
IND vs NZ: पंत किपिंगला आलाच नाही! ध्रुव जुरेलने घेतली जागा; 'त्या' फोटोने वाढवली चिंता
8
एमआयएममुळे आता काँग्रेसचे वाढले टेन्शन; नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रंगत 
9
वडिलांकडून पैसे घेतले उधार, छोट्या खोलीत सुरू केलं काम; बहिणींनी उभी केली ३५०० कोटींची कंपनी
10
“रवी राणा यांच्यामुळेच नवनीत राणा खासदार होऊ शकल्या नाहीत”; बच्चू कडूंचा थेट प्रहार
11
डेटिंग ॲपद्वारे फसवणुकीचे जाळे; पुण्यासह नागपूर आणि दिल्लीतही हनी ट्रॅपद्वारे लुटण्याचे प्रकार उघडकीस
12
बाप-बेटी एकाचवेळी नशीब अजमावणार; निवडणूक शिवाजीनगरमधून लढणार?
13
Jasprit Bumrah नंबर वन! एक विकेट घेताच नावे झाला खास विक्रम; अश्विनला टाकलं मागे
14
५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का
15
३२ टक्क्यांपर्यंत घसरला TATA च्या 'या' कंपनीचा नफा; आता शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा
16
"बाबा सिद्दीकी चांगला माणूस नव्हता, त्यांच्यावर..."; लॉरेन्स बिश्नोईच्या शूटरचे धक्कादायक वक्तव्य
17
समीर वानखेडेंना शिंदेसेनेचा नकार, संजय शिरसाट यांनी स्पष्टच सांगितलं 
18
Diwali 2024: कसे करावे देवाच्या जुन्या, भग्न मूर्ति आणि फोटोंचे विघटन? वाचा शास्त्रशुद्ध उपाय!
19
मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि मेळावाच रद्द झाला; ठाणे जि.प. च्या माजी उपाध्यक्षांना मुरबाड देणार?
20
Diwali 2024: दिवाळीत घराबरोबरच मनाची स्वच्छता कशी करायची ते सांगताहेत गौर गोपाल दास!

Sangli: ब्रेकअपनंतर वादंग : प्रियकर, प्रेयसीच्या गटात बेदम हाणामाऱ्या; चौदा जणांवर गुन्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 11:37 AM

सांगली : शहरातील समर्थ घाट परिसरात रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांचे ...

सांगली : शहरातील समर्थ घाट परिसरात रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांचे आठ जण जखमी झाले आहेत. ब्रेकअप झालेल्या प्रेयसीला त्रास देत असल्याच्या संशयावरून ही मारामारी झाली.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी चौदा जणांवर गुन्हे दाखल केले. आदित्य श्रीराम वैद्य (वय २१, रा. वैद्य सहनिवास, झुंझार चौक, गावभाग, सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रियकर व प्रेयसी यांच्यातील भांडण सोडविण्यास गेलेल्या पाच जणांना आठ जणांनी काठी आणि लाथाबुक्क्यांनी बदडून काढले. ही घटना नदीकाठी स्वामी समर्थ घाटावर घडली. वैद्य यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अरबाज मुजावर आणि त्याच्या अनोळखी आठ साथीदारांवर गुन्हे दाखल केले.पोलिसांनी दिलेली माहिती अशी : आदित्य वैद्य आणि प्रथमेश सातपुते हे दोघे मित्र आहेत. प्रथमेशची मैत्रीण आणि तिचा सध्याचा प्रियकर अरबाज मुजावर यांच्यात रविवारी रात्री समर्थ घाटावर वाद सुरू होता. त्यावेळी अरबाजने तिला मारहाण सुरू केली. यादरम्यान त्याच परिसरात असणारे आदित्य आणि प्रथमेश, तसेच त्यांचे मित्र स्वयम, सुमित आणि हेमंत हे मारहाण थांबविण्यासाठी धावले. त्यावेळी अरबाजने, आमच्या भांडणात तुम्ही मध्ये का आलात? असा जाब विचारला. आपल्या आठ साथीदारांना बोलावून घेतले. या सर्वांनी आदित्य व त्यांच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काठीनेही मारले. आदित्य यांच्या दुचाकीचीही (एमएच १० सीझेड १७७७) तोडफोड केली. त्यात गाडीचे १० हजारांचे नुकसान जाले.

ब्रेकअप झालेल्या मैत्रिणीला त्रासदरम्यान, याच प्रकरणात अरबाज अन्वर मुजावर (वय २१, रा. नेहरूनगर, लव्हली सर्कल, संजयनगर, सांगली) यानेही फिर्याद दिली. त्यानुसार अरबाज आणि त्याची प्रेयसी लग्न करणार होते, पण घरच्यांच्या विरोधामुळे दोघांचे ब्रेकअप झाले. त्याची प्रेयसी ही प्रथमेश (पूर्ण नाव माहिती नाही) याची पूर्वीची मैत्रीण होती. ‘अरबाज हा आपल्या मैत्रिणीला त्रास देत आहे’, असा प्रथमेशचा गैरसमज झाला होता. त्यामुळे त्याने सहा साथीदारांसह समर्थ घाटावर येऊन अरबाजला काठीने मारहाण केली. त्यावेळी अरबाजला वाचविण्यासाठी त्याचे वडील आणि मावसभाऊ आले. त्यांनाही संशयितांनी काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी दोन्ही बाजूंकडील चौदा संशयितांवर गुन्हे दाखल केले.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस