लोकमत न्यूज नेटवर्ककोकरुड : सावंतवाडी (ता. शिराळा) येथील विकास शेळके याने आपल्या लग्नपत्रिकेतून ‘स्वच्छ भारत’ व ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश दिला आहे. पत्रिकेत केवळ संदेश न देता या युवकाने स्वत:च्या लग्नकार्याची सुरुवातच वृक्षारोपणाने केली.लग्नपत्रिकेतून लग्नाच्या माहितीव्यतिरिक्त समाजाला त्यातून संदेशही मिळावा, यासाठी विकास शेळके यांचे निसर्गमित्र मेहुणे अरुण कडवेकर यांनी, लग्नपत्रिका कमी किमतीची असली तरी चालेल, पण त्यात शुभसंदेश असावेत, असा विचार मांडला. शेळके कुटुंबियांनीही त्याला दुजोरा दिला. लग्नपत्रिकेवर वरच्या बाजूला ‘स्वच्छ भारत’ आणि त्याखाली ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश देण्यात आला आहे. सावंतवाडीसारख्या छोट्या, दुर्गम गावातील या लग्नपत्रिकेचे कौतुक होत आहे. या पत्रिकेची चर्चा चांगलीच होत आहे.लग्नादिवशी विकास शेवाळे यांनी लग्न लागण्यापूर्वी मंडपाच्या शेजारीच एक झाड लावून, ‘फक्त सांगत नाही, तर ते कृतीतही आणतो’, हे दाखवून दिले आहे. या विवाहाची व पत्रिकेची चर्चा मात्र रंगली आहे.
पत्रिकेतून स्वच्छ भारताचा संदेश; विवाहापूर्वी केले वृक्षारोपण
By admin | Published: May 23, 2017 11:35 PM