सांगली : नागरी भागात शिरलेले पुराचे पाणी ओसरु लागले आहे. त्यामुळे चिखल व इतर भिजलेल्या साहित्यामुळे रोगराई पसरु नये यासाठी महानगपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहिम गतीने राबवावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील गणपती पेठ, कृष्णामाई घाट, भाजी मंडई, साठे नगर, सिध्दार्थ नगर या भागाची पाहणी केली. यावेळी महापालका आयुक्त नितिन कापडनीस, उपायुक्त राहुल रोकडे, चिफ सॅनिटरी इन्सपेक्टर अविनाश पाटणकर आदी उपस्थितीत होते.पूरग्रस्त भागाची पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रात असून 8 ते 10 क्षेत्र पाण्याखाली आहे. तरीही ज्या भागातील पाणी पुर्णपणे ओसरले आहे. त्या भागात स्वच्छता मोहिम तातडीने सुरु करण्यात यावी. स्वच्छते मोहिमेसाठी आरोग्य पथकांना ज्या भागात स्वच्छता मोहिम प्राधान्याने राबविणे आवश्यक आहे त्या ठिकाणी पाठविण्यात यावे.
ज्या भागातील ड्रेनेज सिस्टीम तुंबले आहे त्याचा निचरा तातडीने होईल यासाठी प्रयत्न करावेत. ज्या ठिकाणी अडचणी आहेत. त्या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्याची योग्य पध्दतीने नियोजन करण्यात यावे.
पुढे म्हणाले, निवारा केंद्रातील काही कुटुंबे आपआपल्या घरी परतत आहेत तसेच घरांच्या परिसराची स्वच्छता करत आहेत. अशा वेळी दक्षता घेवून स्वच्छता करावी. विशेषत: विद्युत उपकरणे सुरु करताना दक्ष रहावे. महापालिकेच्यावतीने पूर काळात करण्यात ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या चित्रीकरणाच्या आधारे 2021 ची पूररेषा निश्चित करावी.
त्याचबरोबर त्याचे अभिलेखे तयार करावी तसेच बाधित ठिकाणांची वस्तुनिष्ठ पंचनामे करावे. लॅप्टोस्पारसेसची साथ पसरु नये यासाठी प्रतिबंधक गोळ्याचे वाटप सुरु करावे. तसेच मशिनरीने औषध फवारणी सुरु करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.महानगरपालिका आयुक्त नितीन कापडनीस यावेळी म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रातील ज्या ज्या भागातील पाणी ओसरले आहे त्या त्या भागात महापालिकेच्या 200 वाहने व मशिनरी तसेच 2 हजार अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून आलेले स्वच्छता पथकही कार्यरत झाले आहे.
शहरातील तातडने कुजणारे पदार्थ व कागद यांच्या स्वच्छतेबरोबरच ज्या भागात पाण्यामुळे 1 ते 2 फुट माती सदृश्य गाळ साचला आहे. या भागात प्राधान्याने स्वच्छता मोहिम सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या बहुतांश योजना सुरु करण्यात आल्या असून ज्या योजना बंद आहेत त्याची तात्काळ दुरुस्ती करुन त्याही तातडीने सुरु करण्यात येणार आहेत. नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरु करण्यात आली आहेत.