शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

विवेकस्पर्शी चळवळीचा निर्मळ कार्यकर्ता

By admin | Published: April 28, 2016 11:54 PM

निळूभाऊ फुल्यांनी सामाजिक कृतज्ञता निधीतून राहुलला वेतन मिळावं यासाठी स्वत: पत्र लिहिलं. डॉ. श्रीराम लागू यांच्या संकल्पनेतून सामाजिक कृतज्ञता निधीची कल्पना पुढे आली आणि

दाभोलकरांच्या विवेकवादी विचारस्पर्शाने प्रेरित झालेला राहुल तासगाव तालुक्यातील बलगवडेचा. आई-वडील शेतमजूर. घरात आंबेडकरी विचारांचा पुरोगामी वारसा होता. राहुल दहावीत असताना विधानसभेची निवडणूक होती. त्यात राहुल सवंगड्यांसोबत आर. आर. पाटील आबांच्या प्रचारात सहभागी झाला होता. एक दिवस सभा संपल्यावर आबांनी झाडाखाली जेवण मागवले. तिथेच त्यांनी भास्कर सदाकळे यांना, ‘तुमचं ते अंधश्रध्दा निर्मूलनाचं आख्यान लावा’, असं सांगितले. मग सदाकळेंनी लोकांचं प्रबोधन आणि मनोरंजन केलं. राहुलनं तिथंच अंधश्रध्दा निर्मूलनासाठीच काम करायचं निश्चित केलं.दहावीनंतर आयटीआयला तासगावात प्रवेश घेतला. तिथं प्रा. बाबूराव गुरव, विजय कराडे, प्रताप घाडगे यांचा चळवळीच्या माध्यमातून संबंध आला. आयटीआयला तो जिल्ह्यात पहिला आला. मुलाखतीशिवायच किर्लोस्कर कंपनीत नोकरी मिळाली. पहिला पगार त्यानं अंधश्रध्दा निर्मूलन समितीला देणगी म्हणून देऊ केला. सगळ्यांनाच अप्रूप वाटलं. १९९९ मध्ये त्यानं ‘लोकमत’चा प्रतिनिधी म्हणून पत्रकारितेला सुरुवात केली. यातून शोधपत्रकारिता सुरू झाली. त्याची गती बघून डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्राची जबाबदारी घेण्याविषयी सुचवलं. दाभोलकरांचा साधेपणा आणि विचारांनी प्रभावित झालेल्या राहुलसाठी ही जबाबदारी म्हणजे समस्त चळवळीने दाखविलेला गाढा विश्वास होता. गेली २० वर्षे वार्तापत्राचा प्रकाशक, व्यवस्थापकीय संपादक आणि शोधपत्रकारिता करणारा परखड लेखक अशा विविध भूमिकांतून त्याने हा विश्वास सार्थ ठरवला आहे. त्याची तळमळ, कामाची पध्दत बघून कुणासाठीही शिफारस न करणाऱ्या निळूभाऊ फुल्यांनी सामाजिक कृतज्ञता निधीतून राहुलला वेतन मिळावं यासाठी स्वत: पत्र लिहिलं. डॉ. श्रीराम लागू यांच्या संकल्पनेतून सामाजिक कृतज्ञता निधीची कल्पना पुढे आली आणि त्यासाठी डॉ. बाबा आढाव, डॉ. नरेंद्र दाभोलकर, निळूभाऊंनी एक कोटीचा निधी उभा केला. राहुल ‘अंनिस’चा फुलटाईम कार्यकर्ता झाला, तेव्हा त्याच्या आईला शेतात भांगलण्यासाठी ३० रूपये मजुरी मिळत होती, पण आई-वडिलांनी व भावाने त्याच्या भूमिकेला व कार्याला नेहमीच पाठिंबा दिला. ‘अंनिस’च्या कायदेशीर सल्ल्याचं काम दिवंगत अ‍ॅड. दत्ताजीराव माने स्वखर्चानं करायचे. दत्ताजीरावांचे जीवनचरित्र लिहिण्याची जबाबदारी राहुलवर आली. ‘अंनिस’चे संपादक प्रा. प. रा. आर्डे, कुमार मंडपे यांच्या जीवनकार्याच्या पुस्तिकाही त्याने लिहिल्या. ‘जोडीदाराची निवड व आंतरजातीय विवाह’ या पुस्तकाचे संपादन त्याने केले आहे. धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या बुवाबाजीवर सडेतोड लिखाण केले आहे. आसाममधील चेटकिणी समजून महिलांवर केल्या जाणाऱ्या अत्याचारांवर त्याने तेथे जाऊन शोधक वृत्तीने लिहिले आहे. जातपंचायती आणि त्यातून घडणाऱ्या अन्यायाविरोधात संशोधनपर लेखन केले आहे. नागनाथअण्णांच्या पाणी चळवळीतही कार्यकर्ता म्हणून तो कार्यरत राहिला. कॉ. गोविंद पानसरेंच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या राजर्षी शाहू आंतरजातीय विवाह सहाय्यता केंद्राचा सचिव म्हणून तो कार्यरत आहे. ‘अंनिस’ने गतवर्षी नाशिक येथे ‘उत्कृष्ट युवा कार्यकर्ता पुरस्कार’ देऊन राहुलचा गौरव केला. - महेश कराडकर चमत्कार-जादुटोणा करणाऱ्यांचे, गंडेदोरे-अंगारे-धुपारे देऊन लोकांना फसवणाऱ्यांचे पितळ विज्ञानाच्या कसोटीवर उघडे पाडण्याची विवेकवादी चळवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून राबवली जात आहे. एकीकडे याला विरोध होत असताना, अंनिसचे कार्यकर्ते प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहेत. या चळवळीच्या ‘अंधश्रध्दा निर्मूलन वार्ता’ या मुखपत्राला आता २५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त दुसरे अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलन १४ व १५ मेरोजी सांगलीत होणार आहे. या संमेलन समितीचा सचिव आणि गेली वीस वर्षे ‘अंनिवा’चा व्यवस्थापकीय संपादक व प्रकाशक म्हणून काम करणाऱ्या राहुल थोरात या कार्यकर्त्याचा जीवनपट संघर्षाने भरला आहे.