------
राष्ट्रीय लोकअदालतीचे १० रोजी आयोजन
सांगली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सांगलीत १० रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात फौजदारी, दिवाणी कौटुंबिक दावे, अपघात भरपाई, वीजबिल, घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीची प्रकरणे ठेवता येतील. ही प्रकरणे तडजोडीने मिटविण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव विश्वास माने यांनी केले आहे.
---------
टर्फ विकेटवर खेळाडूंची गर्दी
सांगली : छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरील क्रिकेटसाठी तयार करण्यात आलेल्या टर्फ विकेटवर ॲथलेटिक खेळाडूंकडून वारंवार अतिक्रमण केले जात आहे. त्यामुळे विकेटवरील गवत गेले आहे. मुख्य विकेटवर सायंकाळी मोठी गर्दी असते. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देऊन मुख्य विकेट वाचवावी, असे आवाहन क्रिकेट खेळाडूंकडून करण्यात येत आहे.
--
शहरात नाल्याची स्वच्छता
सांगली : गर्व्हमेंट काॅलनीतील ढेरे मळा परिसरात महापालिकेच्या वतीने नाल्याची स्वच्छता हाती घेण्यात आली आहे. गतवर्षी कुंभार मळा परिसरात नाल्याचे पाणी घरात शिरले होते. या परिसरात बांधीव नाले करण्याची मागणी होत आहे. नगरसेविका सविता मदने, अप्सरा वायदंडे यांनी नाले स्वच्छतेची पाहणी केली.