युनूस शेख ।केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानांतर्गत इस्लामपूर नगरपालिकेने २०१८ मध्ये पश्चिम भारतातील महाराष्टÑ, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश अशा पाच राज्यांतून ९ वा क्रमांक पटकाविला, तर २०१९ मध्ये ५० हजार ते १ लाख लोकसंख्येच्या गटात प्रथक क्रमांक पटकावण्याची देदिप्यमान कामगिरी केली. या अभियानातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे शहराला १५ कोटी रूपयांचा निधी मिळणार असल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
प्रश्न : स्वच्छता अभियानात इस्लामपूर पालिकेने मिळविलेल्या यशाचे श्रेय कुणाला द्याल?उत्तर : स्वच्छतेच्या अभियानाला लोकचळवळ बनवून घरा-घरात आणि प्रत्येकाच्या मना-मनात स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात यशस्वी ठरल्यानेच, पश्चिम भारतातील पाच राज्यांतून अव्वल दर्जाची कामगिरी करण्याचा बहुमान इस्लामपूर शहराला मिळाला. शहरवासीयांसह समाजातील प्रत्येक घटकाची साथ आणि प्रत्यक्ष स्वच्छतेसाठी राबलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचे अतुलनीय योगदान, हे या यशामागील खरे सूत्रधार आहेत.
प्रश्न : स्वच्छता अभियानात यशस्वी होण्यासाठी काय योजना केल्या?उत्तर : या अभियानाच्या माध्यमातून ‘कचराकुंडीमुक्त शहर’ म्हणून नावारूपाला आणता आले. १५ हजारहून अधिक घरांमध्ये डस्टबिनचे वाटप केले. दैनंदिन आठ टन इतका ओला कचरा संकलित होऊ लागला. त्यावर प्रक्रिया करीत कंपोस्ट खत निर्मिती केली. त्याला शासनाने ‘हरित ब्रॅन्ड’ या नावाने मान्यता दिली. जिथे नागरिक उघड्यावर कचरा टाकायचे, तेथे विरंगुळ्यासाठी बैठक व्यवस्था केली. त्या परिसरात रांगोळी रेखाटली. या गांधीगिरीमुळे उघड्यावर पडणारा कचरा शेवटी कचरा संकलन करणाºया घंटागाड्यांमध्ये पडू लागला. तसेच जवळपास दीड हजार कुटुंबांनी कंपोस्ट खत निर्मिती करून अभियानाच्या यशामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.शहरवासीयांचा उत्स्फूर्त सहभागअभियानात १७ हजार शालेय विद्यार्थ्यांच्या सहभागाने काढलेली ‘स्वच्छता रॅली’ शहरातील प्रत्येक नागरिकाच्या मनावर सकारात्मक परिणाम करणारी ठरली. त्यानंतर वेळोवेळी सर्वच समाजघटकांसोबत चर्चा, बैठका घेत अभियानाची गती वाढविण्यात यश आले.कर्मचाऱ्यांची साथ मोलाचीस्वच्छतेसाठी शहराचे चार विभाग करून हे अभियान राबविले. व्यापारी पेठेत दिवसातून दोनवेळा स्वच्छता केली. नगरपालिकेने मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी प्रशासन प्रमुख या नात्याने सर्व घटकांना सोबत घेत प्रत्येक उपक्रम चांगल्या पध्दतीने राबविला. या अभियानात पालिकेतील सर्व नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तर सहभागी झालेच, मात्र प्रत्यक्ष स्वच्छतेचे काम करणाºया स्वच्छता कर्मचाºयांचाही या यशामध्ये मोलाचा वाटा आहे.