शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

पाण्याच्या टाकीवर चढून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:25 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. उपनगरात तर अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. उपनगरात तर अपुऱ्या पाणीपुरवठ्याने नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आम्हीही पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करावे का? अशा शब्दांत बुधवारी ऑनलाईन महासभेत नगरसेवकांनी पाणीपुरवठा विभागाला धारेवर धरले. महापौर गीता सुतार यांनी पंपिंग वाढवून लोकांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याची सूचना दिली.

महापालिकेच्या सभेत नगरसेविका नसीमा नाईक यांनी अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. शामरावनगरमधील पाण्याबाबत नागरिक, महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले, तेव्हा अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. पण आठवडा लोटला तरी अपुरा पाणीपुरवठा होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. भाजपचे नेते शेखर इनामदार म्हणाले की, सदस्यांनी आंदोलन करूनही प्रश्‍न सुटत नाहीत हे गांभीर्याने घेतले पाहिजे. यामुळे लोकांच्या रोषाला सदस्यांना सामोरे जावे लागते. खालची यंत्रणा काम करत नाही. अधिकाऱ्यांना अभ्यास नाही, थातूरमातूर उत्तरे देतात, असा आरोप केला.

विश्रामबाग, वारणाली परिसरासाठी पाण्याची टाकी बांधण्याच्या निर्णयाला महासभेत मंजुरी देण्यात आली. मात्र केवळ पाण्याच्या टाक्‍या उभारून काय उपयोग? टाक्‍या असल्या तरी पाणीपुरवठा का होत नाही, असा सवाल नगरसेवक विष्णू माने, संतोष पाटील यांनी उपस्थित केला. माने यांनी अधिकाऱ्यांवर दबाव असल्याने पाण्याचे नियोजन होत नसल्याचा आरोप केला. पाण्याच्या टाक्‍या असूनही उपसा यंत्रणा सक्षम नसल्याने अपुरा पाणी पुरवठा होत असल्याचे संतोष पाटील म्हणाले. त्यात सुधारणा झाली नाही तर आम्हालाही टाक्‍यांवर चढून आंदोलन करावे लागेल असे ते म्हणाले. यावर पंपिंग वाढवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाणी देण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश महापौर सुतार यांनी दिले.

चौकट

आयुक्तांचा रोष

आयुक्त कापडणीस यांनीही अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला. ते म्हणाले, आयुक्त उत्तरे देतात म्हणून अधिकारी निष्काळजी झाले आहेत. ते गाफील राहतात. विभाग प्रमुख, सहायक आयुक्तांनी त्यांच्या प्रभागाच्या बैठका घेतल्यावर बरेचसे प्रश्‍न सुटतील. त्यांनी अभ्यास करावा, अशी सूचना केली.