सांगली : जिल्ह्याच्या कमाल तापमानात आणखी घट झाली असून, बुधवारी पारा ३२.२ अंश सेल्सिअस नोंदला गेला. किमान तापमान अद्याप सरासरीच्या जवळ आहे. गुरुवारी पुन्हा पावसाचा अंदाज असून, शुक्रवारपासून ढगांची दाटी हटणार आहे.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगांची दाटी व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. वळीव पावसाच्या हजेरीने तापमानात घट झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आत आहे. बुधवारी ते आणखी कमी होऊन ३२.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. एप्रिलच्या सरासरीपेक्षा ते ६ अंशाने कमी आहे. दुसरीकडे किमान तापमान अद्याप सरासरीच्या जवळ आहे. बुधवारी किमान तापमान २३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. गुरुवारी पुन्हा पावसाचा अंदाज असून, शुक्रवारपासून ढगांची दाटी हटणार आहे.