सांगली : जिल्ह्याच्या तापमानात वाढ होत असताना पुन्हा ढगाळ वातावरण राहणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार २४ एप्रिलपर्यंत चार दिवस ढगांचा जिल्ह्यात मुक्काम असेल, मात्र पावसाची शक्यता नाही.
भारतीय हवामान खात्याने नोंदविलेल्या निरीक्षणानुसार बुधवारी २१ एप्रिलपासून २४ एप्रिलपर्यंत दररोज दुपारी किंवा सायंकाळी ढगाळ वातावरण राहणार आहे. अंशत: ढगाळ वातावरण राहणार असले तरी पावसाची शक्यता नाही. त्यानंतर २५ एप्रिलपासून आकाश निरभ्र राहणार आहे. या काळात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी जिल्ह्याचे कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. किमान तापमानात अंशाने घट होऊन पारा आता २ अंश सेल्सिअस इतका झाला आहे. आठवड्याभरात कमाल तापमान ४० पर्यंत तर किमान तापमान २४ अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे.