शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

इस्लामपूर पालिकेत गोंधळ

By admin | Published: March 01, 2017 12:28 AM

अभूतपूर्व गदारोळात सभेचे कामकाज गुंडाळले; २०२ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

इस्लामपूर : इस्लामपूर शहराच्या २०१६-१७ चा सुधारित व २०१७-१८ चा २०२ कोटी ७३ लाख रुपयांच्या आणि ५३ हजार रुपये शिलकीच्या अंदाजपत्रकाला मंगळवारी सत्ताधारी विकास आघाडीने १४ विरुद्ध ० मतांनी मंजुरी दिली. सभेला सुरुवात झाल्यावर विरोधी राष्ट्रवादी सदस्यांनी अर्थसंकल्पावर बोलू दिले नसल्याचा आरोप केला, तर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी करवाढ नसलेला आणि विविध वैशिष्ट्यपूर्ण योजनांचा समावेश असलेला हा अर्थसंकल्प मंजुरीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून मताला टाकल्यानंतर राष्ट्रवादीचे सदस्य तटस्थ राहिल्याने १४-० अशा मतांनी रीतसर मंजूर केल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आक्रमक राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मारून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीच्या शहाजी पाटील यांनी लिपिकाकडील हजेरी पुस्तक ताब्यात घेऊन बाहेर आणल्यानंतर सत्ताधारी व विरोधकांत मुख्याधिकारी दालनातच काही वेळ रणकंदन माजले.अण्णासाहेब डांगे सभागृहात मंगळवारी पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्पीय विशेष सभा झाली. यावेळी सभागृहात ३० सदस्य उपस्थित होते. सभेला सुरुवात करण्यापूर्वी कोरम पूर्ण झाल्याची खात्री नगराध्यक्षांनी केली. २३ सदस्यांच्या हजेरी पुस्तकावर स्वाक्षरी झाल्याने त्यांनी प्रशासनाला विषय वाचन करण्याची सूचना केली. यादरम्यान विरोधी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी उपनगराध्यक्षांना खाली बसविल्याचा मुद्दा घेत सत्ताधाऱ्यांनी परंपरा मोडल्याचा आरोप केला. त्यातच नगराध्यक्ष पाटील यांनी विषयाचे वाचन झाल्यावर अर्थसंकल्पावरील सूचनांबाबत विचारणा केली.विकास आघाडीच्या विक्रम पाटील यांनी अर्थसंकल्पाची नोटीस व प्रत सात दिवस अगोदर मिळाल्याने वाचन झाले आहे. शहर विकासाच्या या अर्थसंकल्पाला मंजुरी द्यावी, अशी सूचना मांडली. नगराध्यक्ष पाटील यांनी ही सूचना मताला टाकली. त्यावेळी विकास आघाडीच्या १४ सदस्यांनी हात वर केला, तर इतर सदस्य तटस्थ राहिल्याने १४-० अशा मतांनी हा अर्थसंकल्प गोंधळातच मंजूर झाला. राष्ट्रगीत होऊन सभा संपल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी जाहीर केल्यावर पुन्हा गोंधळाला सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे शहाजी पाटील हजेरी पुस्तक घेऊन सभागृहातून बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ विकास आघाडीचे विक्रम पाटील, आनंदराव पवार, वैभव पवार यांच्यासह राष्ट्रवादीचेही सदस्य धावले. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. अ‍ॅड. चिमण डांगे यांनी हे हजेरी पुस्तक ताब्यात घेऊन ते महिला सदस्यांकडे दिले. त्यानंतर सत्ताधाऱ्यांचा निषेध करीत राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मारला. (प्रतिनिधी)हजेरी पुस्तक पळवून नेल्याचा आरोपअर्थसंकल्पीय सभेनंतर सदस्यांचे हजेरी पुस्तक सभागृहाबाहेर आल्याने गोंधळ उडाला होता. त्यानंतर साडेबाराच्या सुमारास शहाजी पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे यांच्यासह महिला सदस्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात येऊन हे हजेरी पुस्तक बाहेर सापडले आहे, असे सांगून ते मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्या स्वाधीन केले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी हे हजेरी पुस्तक पळवून नेल्याचा आरोप विकास आघाडीच्या सदस्यांनी केला.