शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

‘आलात तर तुमच्यासह अन्यथा तुमच्याशिवाय’; सांगलीच्या जागेवरून संजय राऊत यांचा काँग्रेसला इशारा

By घनशाम नवाथे | Published: April 05, 2024 1:13 PM

'विशाल पाटील हे संसदेत कसे जातील, याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल'

सांगली : राज्यात रामटेक, कोल्हापूर, अमरावती या जागा आम्ही त्यांना दिल्या. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांनी राष्ट्रीय विचार करावा. हिंदकेसरीने गल्लीतील कुस्ती खेळू नये. सांगलीच्या जागेचा तिढा कशासाठी निर्माण केला जातोय. चंद्रहार यांनी जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. त्यामुळे आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय, असा विचार करावा लागेल. कारण शिवसेनेचे हे ५५ वर्षांचे धोरण आहे, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.सांगलीत विश्रामबाग येथील हॉटेलमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सांगलीच्या जागेवरून नाराजी वाटत नाही. देशात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. सांगलीच्या जागेबाबत वादाचा विषयच नाही. सांगलीची जागा ही कोणत्या पक्षाची नसून महाविकास आघाडीची आहे. या निवडणुकीत सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र आलो तर केंद्रात काँग्रेस पक्षाला सरकार स्थापनेसाठी मदत होईल. काँग्रेसला त्यांचा पंतप्रधान हवा असेल तर त्यासाठी सांगलीतील खासदार निवडून द्यावा. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील विचार करावा. सांगलीच्या जागेसाठी अडून बसणे म्हणजे हिंदकेसरीने गल्लीतील कुस्ती खेळण्यासारखे आहे. त्यांनी त्या उंचीवरच बोलले पाहिजे.खासदार राऊत पुढे म्हणाले, भिवंडीत आम्ही राष्ट्रवादीला मदत केली. तसेच काँग्रेसने सांगलीत मदत केली पाहिजे. सांगलीबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी बाेललो आहे. राज्यात रामटेक, कोल्हापूर आणि अमरावतीची जागा दिल्यानंतर सांगलीचा तिढा कशासाठी? असा प्रश्न निर्माण होतो. सांगलीत चंद्रहार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. चंद्रहार पाटील यांनी जोरदार तयारी सुरू ठेवली आहे. ‘आलात तर तुमच्यासह नाहीतर तुमच्याशिवाय’ असा निर्णय घ्यावा लागेल. कारण ५५ वर्षांचे हे शिवसेनेचे नव्हे तर स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण आहे. सांगलीची जागा शंभर टक्के जिंकली जाईल.

यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, शिवसेना उपनेते नितीन बानुगडे - पाटील, दिगंबर जाधव, जिल्हाप्रमुख संजय विभुते, अभिजीत पाटील, बजरंग पाटील आदी उपस्थित होते.विशाल यांना संसदेत पाठवूखासदार राऊत शुक्रवारी सकाळी कवलापूर विमानतळाच्या जागेवर हेलिकॉप्टरने उतरल्यानंतर पत्रकारांनी त्यांना गाठले. तेव्हा सांगलीच्या जागेबाबत विचारले असता ते म्हणाले, विशाल पाटील यांच्याबाबत आम्हाला आस्था, प्रेम आहे. विशाल पाटील हे संसदेत कसे जातील, याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल. त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची जबाबदारी आमची राहील.

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाSanjay Rautसंजय राऊतvishal patilविशाल पाटीलcongressकाँग्रेस