आरआयटीमध्ये कम्युनिटी रेडिओ स्टेशन, रेडिओ शुगरचे उद्घाटन पी.आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयंत पाटील, भगतसिंग पाटील, श्यामरावकाका पाटील,आर. डी. सावंत, डॉ. सुषमा कुलकर्णी, प्रा.श्यामराव पाटील, विकास कर्डिले, प्रतीक पाटील, राजवर्धन पाटील उपस्थिती होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : आपल्या परिसरात नव्याने सुरू झालेल्या कम्युनिटी रेडिओ स्टेशनचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. समाजातील प्रत्येक घटकासाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हणून सर्वांना बरोबर घेऊन या रेडिओने काम करावे आणि त्यातून सामाजिक उन्नती होईल, असे मनोरंजक आणि माहितीपर कार्यक्रम या रेडिओने सादर करावे, अशी अपेक्षा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
वाळवा तालुक्यातील पहिल्या कम्युनिटी रेडिओ स्टेशन, रेडिओ शुगरचे उद्घाटन राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जयंत पाटील, आरआयटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष भगतसिंग पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्यामरावकाका पाटील, सचिव आर.डी. सावंत, आरआयटीच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. श्यामराव पाटील, राजाराम सॉल्व्हेक्सचे उपाध्यक्ष विकास कर्डिले तसेच आदित्य भगतसिंग पाटील, प्रतीक पाटील आणि राजवर्धन पाटील उपस्थित होते.