कामेरी : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील श्रीक्षेत्र मल्लिकार्जुन मंदिरानजीक पुरातन पाताळगंगा झऱ्यातील पाण्याचा स्रोत जतन व्हावा व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची पाण्याची गरज भागावी, या उद्देशाने पाताळगंगा भोवताली बांधकामाचा प्रारंभ झाला.
पाताळगंगा या ठिकाणी स्वच्छ पाणीसाठा व्हावा, म्हणून त्याच्या भोवतालच्या बांधकामाचा संपूर्ण खर्च डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिला. बांधकामाचा प्रारंभ त्यांचे वडील बाबूराव ज्ञानू पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संभाजी पाटील, दिलीप पाटील, सैनिक पाटील, राजेंद्र शेवाळे, बाळकृष्ण पाटील, दादासाहेब पाटील, विकास चौगुले उपस्थित होते.
मल्लिकार्जुन देवस्थान सेवा मंडळाच्या वतीने मंदिर परिसरात विकासकामे, रंगरंगोटी, वृक्षारोपण व संगोपन करण्यासाठी शिवभक्तांनी मदत करावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गोरखनाथ गुरव यांनी केले.