कुपवाड : शहरातील प्रभाग समिती क्रमांक दोनमधील सिद्धार्थनगर रस्त्याचा प्रश्न सोमवारी निकालात निघाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर कोटी निधीतून सिद्धार्थनगर येथील नामदेव थोरात घर ते मल्हारराव होळकर चौक मार्गावरील रस्त्याचे रुंदीकरण आणि हॉटमिक्स डांबरीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली. भाजपचे नगरसेवक प्रकाश ढंग यांच्या उपस्थितीत रहिवासी नागरिकांच्या हस्ते या कामाचा प्रारंभ करण्यात आला.
यावेळी कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोतरे म्हणाले, सिद्धार्थनगर रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. परिसरामध्ये कामगार वर्गाची संख्या अधिक आहे. औद्योगिक क्षेत्राच्या दिशेने जाणारा हा मार्ग असल्याने तो सुस्थितीत असणे गरजेचे होते. नगरसेवक ढंग यांनी लोकांच्या गैरसोयीची दखल घेतली असल्याचे मत व्यक्त केले.
वास्तविक रस्ते कामाची सुरुवात चार दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आली होती. मात्र अडचणीमुळे हे काम थांबविण्यात आले होते. यावेळी नागरिकांच्यावतीने ढंग यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मिलिंद सरोदे, संपत धोतरे, देवानंद धोतरे, अजित सरोदे, आशुतोष धोतरे, संजय धोतरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
फोटो २१ कुपवाड ०१
ओळ : कुपवाडमधील सिध्दार्थनगरमध्ये डांबरीकरणाच्या कामास सोमवारी जलद गतीने सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक प्रकाश ढंग, मिलिंद सरोदे, संपत धोतरे, देवानंद धोतरे, अजित सरोदे, आशुतोष धोतरे, संजय धोतरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.