विटा : खानापूर तालुक्यातील मराठी लोकांनी सुवर्ण व्यवसायात महाराष्ट्राचे नाव देशाच्या सर्व प्रांतांत ताकदीने पोहोचवले. त्यामुळे मराठी उद्योजक आज अन्य व्यवसायातही आपले स्थान मजबूत करीत आहे. रेवणगावसारख्या ग्रामीण भागातून येऊन आपले व्यवसाय कौशल्य वापरत प्रशांत मुळीक व त्यांचे सुपुत्र पंकज मुळीक या मराठी उद्योजकांनी केलेली व्यावसायिक प्रगती कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांनी केले.
विटा येथे शुक्रवारी उद्योजक प्रशांत मुळीक व पंकज मुळीक यांनी नव्याने सुरू केलेल्या ‘हॉटेल पंकज एक्झिक्युटिव्ह’चे उद्घाटन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. आमदार अनिल बाबर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी ‘मनमंदिर’ समूहाचे संस्थापक-अध्यक्ष अशोकराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, उद्योजक जयदीप बाबर, हेमंत बाबर, ज्ञानदेव मुळीक उपस्थित होते.
आमदार अनिल बाबर म्हणाले, आज जगावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. अशा परिस्थितीत नोकरी हा दुय्यम भाग बनला आहे. त्यामुळे आगामी काळात युवकांनी व्यवसायाचे नवीन मार्ग शोधले पाहिजेत. रेवणगावचे प्रशांत मुळीक व पंकज मुळीक या उद्योजक पिता-पुत्रांनी व्यवसायात नवीन भरारी घेऊन युवकांपुढे आदर्श निर्माण केला आहे.
उद्योजक प्रशांत मुळीक यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी विटा शहरात नव्याने सुरू झालेल्या हॉटेल ‘पंकज एक्झिक्युटिव्ह’मुळे युवकांना व्यवसायात नवी दिशा मिळेल, असे सांगितले.
कार्यक्रमास ‘मनमंदिर’चे उपाध्यक्ष चंद्रशेखर यादव, ॲड. सचिन जाधव, संजय सपकाळ, गार्डीचे सरपंच नेताजी बाबर, आशुतोष यादव, विक्रम बाबर, बालाजी बाबर, धर्मेश पाटील, प्रशांत कांबळे, फिरोज तांबोळी, त्र्यंबक तांदळे, व्यवस्थापक राहुल साळुंखे, प्रमोद शेट्टी, जयशील शेट्टी उपस्थित होते.
फोटो : २० विटा २
ओळ : विटा येथे हॉटेल पंकज एक्झिक्युटिव्हचे उद्घाटन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोकराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, जयदीप बाबर, प्रशांत मुळीक, पंकज मुळीक उपस्थित होते.