शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
2
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
5
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
6
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
7
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
8
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
9
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
10
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
11
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
12
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
13
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
14
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
15
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
16
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
17
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
18
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
19
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
20
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले

सांगलीतील वाहतूक कोंडीसाठी तज्ज्ञांची समिती; आयुक्त, पोलिस, नगरसेवक, नागरिकांची बैठक

By शीतल पाटील | Published: July 11, 2023 7:53 PM

सांगली शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्याबाबत महापालिकेत बैठक झाली.

सांगली: शहरातील प्रमुख बाजारपेठेसह मुख्य चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करून ठोस आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाही आयुक्त सुनील पवार यांनी मंगळवारी दिली. तत्पूर्वी पुढील आठ दिवसात शहरातील पार्किंग ठिकाणे विकसित करण्यासह दिशादर्शक फलकाची उभारणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्याबाबत महापालिकेत बैठक झाली. या बैठकीस गटनेत्या भारती दिगडे, उपायुक्त राहुल रोकडे, पोलिस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव उपस्थित होते. प्रारंभी वाहतूक निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, शहर निरीक्षक अभिजित देशमुख यांनी वाहतूक नियोजनाबाबत सूचना मांडल्या. ठिकठिकाणी पार्किंग पट्टे मारून द्यावेत, पार्किंगची ठिकाणे महापालिकेने विकसित करावेत, अशी मागणी केली.

 यावेळी नगरसेवक सुबराव मद्रासी, उर्मिला बेलवलकर, माजी नगरसेवक गौतम पवार, सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर, जनसेवा भाजीपाला विक्रेता संघटनेचे शंभोराज काटकर, सराफ असोएशनचे रणजित जोग, बाजार समितीचे संचालक प्रशांत पाटील मजलेकर आदींनी मते मांडली. शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्याची सूचना गौतम पवार यांनी मांडली. आर्यविन पुलाला समांतर पुल कार्यान्वित झाल्यानंतर अवजड वाहतूकीला तेथूनही बंदी घालावी. अवजड वाहतूकीसाठी रिंग रोडचा वापर करण्याची सक्ती हवी, अशी सूचना शंभोराज काटकर यांनी मांडली.आयुक्त पवार यांनी शहरातील पार्किंग ठिकाणे तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. वाहतूक शाखेच्या समवेत पार्किंग पट्टे, दिशादर्शक फलकही उभारले जातील, असे सांगितले. उपायुक्त राहुल रोकडे यांनी आभार केले.

 बैठकीतील निर्णय० शहरातील पार्किंग ठिकाणे विकसीत करणार० पार्किंगबाबत दिशादर्शक फलक उभारणार० प्रमुख बाजारपेठेतील मार्गावर पंढरे पट्टे मारले जाणार० वाहतूक शाखेच्या मदतीला महापालिका वॉर्डन देणार० शनिवारी हरभट रोडवर बसणाऱ्या भाजी विक्रेत्याना हटविणार० खासगी बसेस उभारणीसाठी स्वतंत्र झोन० शहरात काही ठिकाणी नो पार्किंग झोन० फेरीवाले धोरणाची तातडीने अंमलबजावणी

टॅग्स :Sangliसांगली