शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
2
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
3
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
4
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
5
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
6
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
7
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
8
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
9
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
10
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
11
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
12
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
13
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
14
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
15
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
16
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
17
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
18
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
19
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
20
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

दोन्ही काँग्रेसमध्ये ‘जत’साठी स्पर्धा

By admin | Published: July 21, 2014 11:49 PM

विधानसभा निवडणूक : राजकीय वातावरण तापले

जयवंत आदाटे ल्ल जतजत विधानसभा मतदारसंघावर काँग्रेससह राष्ट्रवादीनेही दावा केला आहे. उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू असली, तरी राष्ट्रवादीत मात्र अद्याप स्पर्धा सुरू झालेली नाही; परंतु तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.गत विधानसभा निवडणुकीत जत मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. मात्र स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी विलासराव जगताप यांना सहकार्य केले नाही. हा मतदारसंघ सतत ३८ वर्ष काँग्रेसकडे राहिल्याने काँग्रेसला उमेदवारी मिळावी, अशी मागणी माजी आमदार उमाजी सनमडीकर, तालुकाध्यक्ष पी. एस. पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. भारती बँकेचे संचालक विक्रम सावंत, बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे व प्रकाश जमदाडे यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत.पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. नऊपैकी सहा जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. तालुक्यात राष्ट्रवादीला काँग्रेसने मदत केली, तर येथून निश्चित विजय मिळणार आहे, असा दावा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. बी. ए. धोडमणी यांनी केला आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी चारवेळा तालुक्याचा दौरा करून विधानसभा निवडणुकीच्या कामाला तुम्ही लागा, उमेदवारीचे नंतर बघू, असा आदेश दिला आहे. त्यामुळे पहिल्या फळीतील कार्यकर्ते कामाला लागले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. प्रभाकर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर यांची नावे चर्चेत आहेत.दुसरीकडे आ. प्रकाश शेंडगे यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे. जत विधानसभा मतदारसंघाचा मी विद्यमान आमदार असून, आपल्याला डावलून पक्ष इतरांना किंवा पक्षात येऊ पाहणाऱ्यांना उमेदवारी देणार नाही. मागील सलग दहा वर्षे येथून भाजप उमेदवार विजयी झाला आहे, असे ते सांगतात.जतचे नेते विलासराव जगताप यांनी जुलैअखेर किंवा आॅगस्टच्या सुरुवातीस भाजपमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्याकडे असलेल्या ‘मॅजिक पॉवर’मुळे ते जिकडे जातात, तिकडे त्यांचे कार्यकर्ते जातात, याचा प्रत्यय नेहमी आला आहे. जनमताचा अंदाज घेऊन त्यांनी वाटचाल सुरू केली आहे. भाजपची उमेदवारी मलाच मिळेल, असा दावा त्यांनीही केला आहे. प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन रणनीती ठरविण्यास त्यांनी २० जुलैपासून सुरुवात केली आहे.